कृषी बातम्या

ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप पीक विमा 2022 साठी 14 जिल्हे पात्र; ‘या’ दिवसापासून होणार वाटप

Crop Insurance | आता सध्या 15 दिवस परतीच्या पावसाने थैमान घातले आहे आणि तसेच पुढच्या आठवड्यात ( Next week ) देखील पाऊस ( Rain ) असाच राहण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून (From Meteorological Department) वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्व भूमीवर सध्या आपण खरीप पिक विम्याची ( Kharif Crop Insurance ) स्थिती जाणून घेऊयात.

तसेच 2022 मध्ये पीक विमा ( Crop Insurance ) रबवण्याकरता 1 जुलै 2022 रोजी शासन निर्णानुसार मंजुरी देण्यात आली होती. तसेच ज्या जिल्ह्यात हवामानाच्या अनुकूलतेनुसार जर 50 टक्के येवढे नुकसान झाले असले तर त्या जिल्ह्यात जिल्हाधिकात्यांच्या (District Collector) माध्यमातून पीक विमा कंपनीला (Crop Insurance Company) नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा: शेतकऱ्यांना मिळणारं मोठं गिफ्ट! किमान आधाभूत किंमत मध्ये होणार ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

कोणत्या जिल्ह्याना मिळणार भरपाई?

आता सध्या पिकांच्या झालेल्या नुकसानीत पीक विमा कंपनीने (Crop Insurance Company ) 14 जिल्ह्यांना नुकसान भरपाई देण्याचे मंजूर केले आहे. त्यात चंद्रपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना HDFC Arbo पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे. तसेच सोलापूर, अमरावती, उस्मनाबाद, लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना AXA India अर्थात भारतीय कृषी विमा कंपनीकडून ही अधिसूचना काढण्यात आली आहे. तर परभणी, वर्धा, अकोला, नागपूर या 4 जिल्ह्यांनसाठी lCIC Lambord या पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्यासाठी United India या कंपनीकडून पीक विमा योजना राबवली जात आहे. ही पीक विमा योजनेची 14 जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आली असून यात 191 तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र आहेत तर 941 महामंडळासाठी ही सूचना लागू करण्यात आली आहे.

कधी पीक विम्याचे वाटप?

या पीक विम्याचे वाटप हे येणाऱ्या एका आठवड्यात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत या पीक विमा ( Crop Insurance) योजनेचे 2 कोटी रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 3 जिल्ह्यात या पीक विमा योजनेचे वाटप करण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Good news for farmers Kharif crop insurance will now be distributed; So 14 districts are eligible for this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button