Lifestyle
Lifestyle| केसांबाबत त्रस्त आहात? पांढरे केस आणि गळती थांबवण्यासाठी घ्या हे ३ घरगुती उपाय|
Lifestyle| केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक (Challenging) असते. केस गळणे, पांढरे होणे, आणि कोंडा यासारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. यापैकीच काही घरगुती उपाय आज आपण पाहूया.
१. खोबरेल तेल आणि आवळा:
- आवळा हे एक उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यात व्हिटॅमिन ई, सी आणि टॅनिन मुबलक प्रमाणात असतात.
- खोबरेल तेलात आवळ्याचे तुकडे घालून गरम करा. तेल थंड झाल्यावर ते केस आणि मुळांमध्ये लावा.
- हे तेल केसांना मजबूत बनवते, पांढरेपणा कमी करते आणि नवीन केसांची वाढ होते. (Lifestyle)
वाचा: Drought| बेदाणा उत्पादकांवर दुष्काळ आणि कमी भावाचा दुहेरी प्रहार|
२. खोबरेल तेल आणि कडीपत्ता:
- कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
- खोबरेल तेलात कडीपत्त्याच्या पाना घालून गरम करा. तेल थंड झाल्यावर ते केस आणि मुळांमध्ये लावा.
- हे तेल स्कॅल्पमधील रक्ताभिसरण (Circulation) वाढवते आणि नवीन केसांची वाढ होते.
३. खोबरेल तेल आणि लिंबू:
खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केस आणि मुळांमध्ये लावा.
हे मिश्रण केसांची वाढ करते, कोंडा कमी करते आणि डोक्यातील कोंडा दूर करते.