Loan | कर्ज घेताय किंवा घेतले तर ‘हे’ ठेवा लक्षात; जाणून घ्या काही महत्वाचे गोष्टी..
Loan: सध्या कर्जाची गरज ही प्रत्येक व्यक्तीला असते. असा कोणताही व्यक्ती नाही की त्याला कर्जाची गरज नाही. फरक एवढाच की जो तो व्यक्त आपापल्या कुवतीनुसार कर्ज काढत असतो. कर्ज काढण्याचे दोन प्रकार आहेत. एक सुरक्षित आणि दुसरे असुरक्षित कर्ज होय.
सुरक्षित कर्ज म्हणजे ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायच असेल तर त्या व्यक्तीने आपल्याकडील एखादी वस्तू गहाण ठेवली जाते. तसेच असुरक्षित कर्ज हे प्रत्येकालाच भेटते असही नाही. असुरक्षित कर्जाची टक्केवारी ही अधिक असते.
वाचा: शेतकर्यांना मिळणार दिवाळीच मोठं गिफ्ट ! या योजनेसाठी 90 टक्के अनुदान…
क्रेडिट स्कोअर तपासणे; कर्जाचा स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळते :
कर्ज घेताना क्रेडिट स्कोर एकदा नक्की तपासणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास तुम्हाला कर्ज मिळत नाही. जर कर्ज मिळाले तर त्यावर व्याज दर अधिक आकारला जातो. बहुतेक वित्तीय संस्था 750+ क्रेडिट स्कोर चांगला मानतात. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तो वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर कर्जासाठी अर्ज करा.
वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…
कर्जाची परतफेड करा अशी:
कर्ज घेताना तुम्ही जेवढी रक्कम घेत आहात त्याचा परतावा तुम्ही करु शकाल का? याचा अंदाज घ्या. जर तितकी परतफेड करणं शक्य नसेल तर असे कर्ज घेऊ नका. कारण, तुम्ही ईएमआय (EMI) भरला नाही तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल आणि त्यासोबतच तुमचा सिबिल स्कोर सुद्धा खराब होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: