Rule canceled कर्नाटक उच्च न्यायालय: हेल्मेट न घातल्याने विमा दाव्यात कपात करण्याचा नियम रद्द
Rule canceled कर्नाटक उच्च न्यायालयाने मोटार वाहन अपघात विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, जर एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि त्या अपघातात दुचाकीस्वाराचीच चूक नसेल तर विमा कंपनीला त्याला पूर् नुकसान भरपाई द्यावी लागेल. यापूर्वी अनेकद विमा कंपन्या जखमी दुचाकीस्वाराला (To the biker) हेल्मेट न घातल्याबद्दल देय दाव्याची रक्कम कमी करत होत्या, मात्र आता उच्च न्यायालयाने हा नियम रद्द केला आहे.
काय आहे प्रकरण?
रामनगर जिल्ह्यातील सदाथ अली खान यांची दुचाकी ५ मार्च २०१६ रोजी भरधाव वेगाने येणाऱ्या कारला धडकली होती. या अपघातात खान यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांच्या मोटरसायकलचेही मोठे नुकसान (damage) झाले होते. खान यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाचा दावा केला. मात्र, विमा कंपनीने खान यांनी हेल्मेट न घातल्याचे कारण देत दाव्याची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न केला.
खान यांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केल. उच्च न्यायालयाने खान यांच्या बाजूने निकाल देत स्पष्ट केले की, सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, हेल्मेट न घातल्याने नुकसान भरपाई कमी करणे हा एकमेव निकष असू शकत नाही. जर अपघातात दुचाकीस्वाराचीच चूक नसेल तर विमा कंपनीला त्याला पूर्ण नुकसान भरपाई द्यावी लागेल.
हा निर्णय का महत्त्वपूर्ण आहे?
हा निर्णय दुचाकीस्वारांसाठी एक मोठा दिलासा आहे. यापूर्वी अनेकदा विमा कंपन्या हेल्मेट न घातल्याचे कारण देत दाव्याची रक्कम कमी करत होत्या. यामुळे दुचाकीस्वारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता दुचाकीस्वारांना न्याय मिळण्याची शक्यत वाढली (increased) आहे.
वाचा: Sugarcane Farmer| उत्तर प्रदेशचे ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ‘ई-शुगरकेन ॲप’ देशभर चर्चेत
न्यायालयाचे मत
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मोटार वाहन अपघातांमध्ये योगदानात्मक निष्काळजीपणाची संकल्पना तेव्हा लागू होते, जेव्हा जखमी पक्षाची स्वतःची निष्काळजीपणा (Carelessness) अपघातास कारणीभूत ठरते. या प्रकरणात खान यांची निष्काळजीपणा अपघातास कारणीभत नव्हती, त्यामुळे विमा कंपनीला त्याला पूर्ण नुकसान भरपाई द्यावी लागेल.