lang="en-US"> अन् चिठ्ठीने संपवला खेळ ! कर्जत जामखेड बाजार समितीचे सभापती पद राम शिंदेंच्या गटाकडे ; रोहित पवारांकडे आली उपसभापती पदाची चिठ्ठी - मी E-शेतकरी

अन् चिठ्ठीने संपवला खेळ ! कर्जत जामखेड बाजार समितीचे सभापती पद राम शिंदेंच्या गटाकडे ; रोहित पवारांकडे आली उपसभापती पदाची चिठ्ठी

अहमदनगर (Ahmadnagr) जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीमध्ये बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाजपचे राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar) यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. अखेर आज ही बहुचर्चित निवडणूक पार पडली.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

अखेर निकाल लागला

मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही गटांना अगदी समसमान मते मिळाली. यामुळे मोठा पेच निर्माण झाला. यावर पर्याय म्हणून सभापती आणि उपसभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीने प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा निकाल ठरवला आहे. यामध्ये आमदार राम शिंदे यांच्या गटामध्ये सभापती पदाची माळ पडली आहे. आमदार रोहित पवार यांच्या गटामध्ये उपसभापती पदाची माळ पडली आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

अशी झाली निवड

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट यांची निवड झाली आहे. परंतु, या निवडणुकी दरम्यान भरपूर नाट्यमय घटना घडल्या. यामध्ये राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान 9-9 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पद मिळवण्यासाठी दोन्ही गटात चांगलीच चढाओढ सुरू होती.

Karjat jamkhed market yard elections result

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version