ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Job Recruitment | खासगी कंपन्यांमध्ये लगेच नोकरीची संधी! महायुती सरकारचा तरुणांसाठी महत्वाकांक्षी प्लॅन

Job Recruitment | Immediate job opportunities in private companies! Grand coalition government's ambitious plan for youth

Job Recruitment | महाराष्ट्रातील महायुती सरकारने तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार खासगी कंपन्यांमध्ये तरुण तरुणींना मुलाखतीनंतर लगेचच नोकरी (Job Recruitment) देणार आहे.

या योजनेचा पहिला राज्यस्तरीय मेळावा 9 आणि 10 डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या मेळाव्यात 200 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे.

उमेदवारांना कोणत्या कंपनीत कोणत्या आणि किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक योग्यता काय याची माहिती या मेळाव्यात दिली जाईल. उमेदवारांच्या बायोडेटांची छाननी करून काहींना मुलाखतीनंतर तिथेच नोकऱ्या दिल्या जातील. तर काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि मार्गदर्शन केले जाईल.

नागपुरच्या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी या आठवड्यात सुरू होणार आहे.

सरकारच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

वाचा : Electric Scooter | काय सांगता? ‘या’ जबरदस्त स्कूटरवर मिळतेय 17 हजारांची सूट; देतेय तब्बल 165km ची रेंज, किंमतही आहे फक्त…

महायुती सरकारने यापूर्वी सरकारी विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विरोधकांच्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक शासकीय विभाग आपल्या पातळीवर अशी भरती करतील अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती.

शासन आपल्या दारी कार्यक्रमामार्फत सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता तरुण तरुणींना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन महायुती सरकारने जनमानसात आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हेही वाचा :

Web Title : Job Recruitment | Immediate job opportunities in private companies! Grand coalition government’s ambitious plan for youth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button