ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Japan Mobility Show | इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात शेणावर चालणारी कार! मोबिलिटी शोमध्ये नवनवीन प्रयोग…

Japan Mobility Show | A dung-powered car in the age of electric vehicles! New Experiments at Mobility Show…

Japan Mobility Show | जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांनी प्रमुख स्थान मिळवले. या शोमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांनी नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर केली. (Japan Mobility Show) तसंच, पारंपरिक वाहनांच्या सीमाही ओलांडण्यात आल्या.

सुझुकी : या कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी शेणावर चालणारी वॅगन आर सादर केली. या कारमध्ये सध्याचं इंटर्नल कम्बश्चन इंजिन तंत्रज्ञान वापरून भारतात विपुल प्रमाणावर असलेला शेणासारख्या जैवभाराचा वापर इंधन म्हणून केला जाणार आहे.

लेक्सस : या कंपनीने LF-ZC बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल (BEV) ही संकल्पना मांडली. ती 2026मध्ये रिलीज होणार आहे. ही वाहनं नेक्स्ट जनरेशन प्रिझ्मॅटिक हाय परफॉर्मन्स बॅटरीवर चालतील. पारंपरिक वाहनांपेक्षा त्यांची रेंज जवळपास दुप्पट असेल.

माझदा : या कंपनीने आयकॉनिक एसपी लालभडक रंगात सादर केली. त्यात माझदा कंपनीच्या युनिक टू रोटर रोटरी ईव्ही सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. हे वाहन कॉम्पॅक्ट आहे.

वाचा : Solar Car | शेतकऱ्यांची राणी आली रे! भारतातील ‘ही’ पहिली सोलर कार सिंगल चार्जमध्ये चालणार 250 किमी..

टोयोटा : या कंपनीने FT-Se इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार कन्सेप्ट सादर केली. ही बॅटरी पॉवर्ड स्पोर्ट्स कूप कार असून, 1980-90मधल्या MR2सारखी दिसते. तसंच, या कंपनीने लँडक्रूझर एसई हे बॅटरी इलेक्ट्रिक वाहनही सादर केलं.

सुबारू : या कंपनीने सुबारू एअर मोबिलिटी कन्सेप्ट आणि सुबारू स्पोर्ट मोबिलिटी कन्सेप्ट अशा दोन संकल्पना सादर केल्या.

मर्सिडीझ-बेंझ : या कंपनीने जी क्लास या ट्रॅडिशनल ऑफ रोडरची इलेक्ट्रिक व्हर्जन असलेली कन्सेप्ट इक्यूजी यात सादर करण्यात आली. तसंच, मर्सिडीझ एएमजी सी 63 एसई परफॉर्मन्स ही स्ट्राँग हायब्रिड परफॉर्मन्स कारही सादर करण्यात आली.

बीवायडी : या चिनी कंपनीने अट्टो थ्री ही मिडसाइझ एसयूव्ही सादर केली. डॉल्फिन नावाची कॉम्पॅक्ट ईव्ही आणि द सील नावाची स्पोर्ट्स सेडान कारही कंपनीने सादर केली.

होंडा : या कंपनीने प्रील्युड कन्सेप्टसारख्या कार्स कार्बन न्यूट्रॅलिटीचं उद्दिष्ट गाठण्यास मदत करतील, असं कंपनीने म्हटलं आहे. उत्तर अमेरिकेसाठी प्रोलॉग ईव्हीचा प्रोटोटाइपही यात सादर करण्यात आला.

अफीला : या सोनी होंडा मोबिलिटी कंपनीने जपानमध्ये अफीला प्रोटोटाइप पहिल्यांदाच सादर केला.

निस्सान : या कंपनीने हायपरफोर्स, हायपर टूरर, हायपर पंक अ‍ॅडव्हेंचर आणि हायपर अर्बन या ईव्ही कार्स सादर झाल्या. आरिया हे लीफचं 90वं अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेलही सादर झालं. फॉर्म्युला ई-रेस कारही सादर झाली.

बीएमडब्ल्यू : या कंपनीने iX2/X2 या नव्या कारचा वर्ल्ड प्रीमिअर केला. बीएमडब्ल्यू व्हिजन न्यू क्लासे या कन्सेप्ट मॉडेलचा एशियन प्रीमिअरही केला.

हेही वाचा :

web Title : Japan Mobility Show | A dung-powered car in the age of electric vehicles! New Experiments at Mobility Show…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button