ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Jalyukta Shivar Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती देण्याचा निर्णय; होणार मोठा फायदा

Good news for farmers! State Government's decision to speed up Jalyukta Shivar 2.0 scheme; It will be a big benefit

Jalyukta Shivar Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार आहे. यासाठी राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.

किती जिल्ह्यांना मिळणार लाभ?
या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर,नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा एकूण २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची आहे. याचबरोबर जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.

शेतकऱ्यांना काय होणार फायदा?
राज्य सरकारच्या कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने आणि खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, जलयुक्त शिवार ही एक लोकचळवळ आहे. या चळवळीला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

वाचा : Jalyukta Shiwar Yojna | “या” जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० योजनेसाठी केवळ ३९१ कामांना मंजुरी जाणून घ्या सविस्तर ….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठं काम झालं. यामुळे महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेनेवर आला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रात पाण्याची समस्या कायमची सुटेल.

सामंजस्य करार
या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, नैसर्गिक शेतीमुळे शेतीतील उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना विषमुक्त शेती करण्याची संधी मिळेल.

Web Title: Good news for farmers! State Government’s decision to speed up Jalyukta Shivar 2.0 scheme; It will be a big benefit

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button