ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Jaldoot App | केंद्र सरकारने ‘जलदूत ऍप’ केले लॉन्च! शेतकऱ्यांना विहीरींच्या पाणी पातळीची मिळणार माहिती, जाणून घ्या कशी?

Jaldoot App | केंद्र सरकारने आगामी काळात पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी एक मोबाइल अॅप विकसित केले आहे, ज्याद्वारे एक मोठी समस्या सोडविली जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘जलदूत ऍप’ (Jaldoot App) हे मोबाईल अॅप लाँच केले आहे, जे ग्राम रोजगार सहाय्यकांना पावसाळ्यापूर्वी आणि नंतर वर्षातून दोनदा निवडक विहिरींची पाणी (Well Water Level) पातळी मोजण्यास सक्षम करेल. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जलदूत ऍपचा वापर गावातील दोन किंवा तीन निवडक विहिरींची पाणी पातळी मोजण्यासाठी देशभरात केला जाईल. त्यामुळे शेतीसाठी (Agriculture) लागणाऱ्या पाण्याचा अंदाज येणार आहे.

वाचा: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एफडीवर मिळणार 10 लाखांचा रिटर्न, जाणून घ्या पॉलिसी

जलदूत ऍप
जलदूत ऍप ग्राम रोजगार सहाय्यकांना वर्षातून दोनदा निवडक विहिरींची पाणी पातळी मोजण्यास सक्षम करेल. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर विहिरींची पाणीपातळी तपासली जाणार आहे. प्रत्येक गावात पुरेसे मोजमाप ठिकाणे निवडणे आवश्यक आहे, जे त्या गावातील भूजल पातळीचे प्रतिनिधी असतील.

जलदूत ऍपचा काय फायदा होईल?
जलदूत ऍप पंचायतींना विहिरींच्या पाणी पातळीची अचूक माहिती आणि डेटा देईल, ज्याचा उपयोग पुढील कामांच्या चांगल्या नियोजनासाठी केला जाऊ शकतो. ऍपचा डेटा ग्रामपंचायत विकास योजना आणि महात्मा गांधी नरेगा योजनांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय, डेटाचा वापर विविध प्रकारच्या संशोधनासाठी आणि इतर कारणांसाठी देखील केला जाऊ शकतो.

वाचा: एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षभरात मिळणार फक्त ‘इतके’च सिलिंडर अन् महिन्याचा कोटाही निश्चित

देशभरात भूजल पातळी झपाट्याने घसरतेय
अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 251 घन किलोमीटर भूजल काढले जात आहे, परंतु असे असूनही भूजल पुनर्भरणाची काळजी घेतली जात नाही आणि देशातील भूजल पातळी सतत खालावत आहे. देशातील अनेक भागांमध्ये भूजलाचे वेगाने शोषण होत आहे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे आणि हे लक्षात घेऊन सरकारने जलदूत ऍप लाँच केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The Central Government has launched the Jaldoot App Farmers will get information about water level of wells, how to know

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button