ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

मोबाईल अधिक वेळ चार्ज करत असाल तर ठरेल हानिकारक; नक्की किती वेळ चार्ज करावा? पहा..

बहुतांश कामं ऑनलाइन (Online) मोबाइलवर होत असल्याने, मोबाइल (Mobile) वापरकर्त्यांना मोबाइल वापरायचा वेळ राहिला नाही. कधीही उठा मोबाईल (Mobile) घेऊन बसा, अशी सध्याची परिस्थिती आहे. काही वापरकर्ते दिवसभर मोबाइल वापरून रात्रीच्या वेळी चार्जिंगला (Charging) लावून झोपतात. तर काही लोक दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मोबाइल (Mobile) चार्जिंग करतात. तर असे केल्यास मोबाईल च्या अतिवापरामुळे किंवा अति चार्जिंगमुळे धोका निर्माण होतो. मोबाईल (Mobile) कधी चार्जिंग लावावा? व कितीवेळ? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया…

मोबाइल कधी आणि किती वेळ चार्ज करावा?

अलीकडच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये अशी खास यंत्रणा असते, की ती फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद करते. असे असले तरी युझर्सनी दररोज रात्रभर मोबाइल चार्जिंगला लावू नये, असे जाणकार सांगतात. अनेक युझर्स रात्रभर मोबाइल (Mobile) चार्जिंगला लावतात आणि दिवसभर त्याचा वापर करतात; मात्र मोबाइलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास नक्कीच लागत नाहीत. तरी चार्जिंग ला एवढ्या वेळ ठेवणे हानिकारक ठरू शकते.

वाचा

चार्जिंग पूर्ण झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास काय होईल?

मोबाइल (Mobile) फोनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. परंतु, अलीकडच्या स्मार्टफोनमध्ये विशिष्ट यंत्रणा असल्याने असं होण्याची शक्यता जवळपास नसते. चार्जिंगच्या वेळी मोबाइल (Mobile) गरम झाला तर काही युझर्स घाबरतात. परंतु, ही भिती व्यर्थ असते. जाणकारांच्या मते, लिथियम आयन बॅटरीत (Battery) चार्जिंगदरम्यान रासायनिक क्रिया होतात. बॅटरीतल्या पॉझिटिव्ह (+) चेंबरमधले आयन निगेटिव्ह (-) चेंबरकडे प्रवाहित होतात. त्यामुळे बॅटरी गरम होते. तसंच मोबाइलची (Mobile) पाठीमागची बाजू गरम होते.

वाचा –

स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट –

सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट (Circuit) बसवण्यात आलेलं असते. त्यामुळे जेव्हा बॅटरी पूर्ण म्हणजेच 100 टक्के चार्ज होते. तेव्हा वीजपुरवठा घेणं बंद करते. बहुतांश स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर (Snapdragon Processor) असतो. हा प्रोसेसर स्मार्ट (Smart) असतो. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर हा प्रोसेसर चार्जिंग बंद करतो. बॅटरी जेव्हा 90 टक्क्यांवर येते तेव्हा पुन्हा चार्जिंग सुरू होतं. त्यामुळे एखाद्या दिवशी रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला तसाच राहिला तरी काळजी करण्याचं कारण नाही. परंतु, रात्रभर मोबाइल चार्जिंग (Mobile charging) सुरू न ठेवणं अधिक फायद्याचे ठरेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button