Soybean Sowing | पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे, कशी तपासावी बियाण्याची उगवण क्षमता?
शेतीमध्ये कोणत्याही पिकाची लागवड करावयाची असल्यास लागवडीपूर्वी त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
Soybean Sowing | बियाणे (Seeds) शेतीत (Agriculture) रुजवण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केल्यास चांगल्या प्रमाणात पिक उगवते. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि उत्पादन देखील जास्त निघते. आता पुढच्या महिन्यात सोयाबीनची पेरणी Soybean sowing) होणार आहे. मात्र, सोयाबीनची पेरणी होण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. कारण असे केल्याने सोयाबीनची पेरणी केल्यानंतर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सर्व सोयाबीन उत्पादकांना पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता (Seed germination capacity) घरीच तपासण्याचे आवाहन केले आहे.
पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक
खरीप हंगामाच्या (Kharif season) नियोजनाबाबत कृषी विभागातर्फे दत्तात्रय पडवळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचवेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीन बियाणे जसेच्या तसे वापरून पेरणी करु नका असे म्हटले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, शिल्लक असलेल्या बियाणे स्वच्छ करावे. त्यातील काड्या, कचरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातील किडके बीज काढून टाकावे. तसेच बियाणे चाळून घ्यावे नंतरच ते पेरणीसाठी वापरावे, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
वाचा: Fertilizer | बाप रे! शेतीतील खतांचे दर वाढले, पण अनुदानामुळे होणार का शेतकऱ्यांच्या खिशावर परिणाम?
गेल्यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यास उगवण क्षमतेबद्दल उद्भवलेल्या समस्या
त्याचवेळी बोलताना कृषी सहायक असलेल्या प्रियांका पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, गेल्यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यास उगवण क्षमतेबद्दलच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी ही बाब लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करावी. तसेच गेल्यावर्षी उद्भवलेल्या या समस्येमुळे कृषी विभागाकडून गावागावांत बियाणे उगवणक्षमता आणि बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके घेतली हात आहेत.
कशी तपासाल बियाण्याची उगवण क्षमता?
• सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे.
• यानंतर 100 बिया एका ओळीत समान अंतरावर 10×10 च्या ओळी कराव्यात.
• त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर आणि शिंपडावे.
• चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात.
• या बियांची संख्या जर 60 असेल तर 60% उगवण क्षमता आहे असे समजावे.
• किंवा ही संख्या 80 असेल तर उगवण क्षमता 80% असल्याचे निश्चित होईल.
अशाप्रकारे यावर्षी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच सोयाबीनची पेरणी करावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: