इतर

Investment tips : ETF बॉण्ड म्हणजे काय? व त्यांने कसा मिळेल गुंतवणूकींवर उत्तम परतावा वाचा इन्वेस्टमेंट टिप्स…

Investment tips: What is an ETF bond? And how to get the best return on investment Read Investment Tips

ETF म्हणजेच Exchange Traded Fund हि एक कमी खर्चीक म्युच्युअल फंड योजना (Low cost mutual fund scheme) आहे. जाच्या भागांची(units) खरेदी विक्री एखाद्या शेअर प्रमाणे खुल्या बाजारात होते. ETF मध्ये विविध प्रकारच्या रोखे जसे की शेअर, सोने, सरकारी रोखे यांचा समावेश होतो.

किरकोळ गुंतवणूकदारांना अनेकदा म्युच्युअल फंडात (In mutual funds) गुंतवणूक करण्याचा सल्ला सरसकट दिला जातो. काहींची जोखोम घेण्याची क्षमता असते तर काहींना स्थिर दीर्घकालीन परतावा तोही जोखमीशिवाय हवा असतो. अशा गुंतवणूकदारांना एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि फंड आॅफ फंड्स (FoFs) चांगले पर्याय आहेत.

( ETF is the best option to get good returns, know how to invest)

जर तुम्ही सोन्यामध्ये(दागिने) गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते विकत घेताना त्यावर मजुरी द्यावी लागते तसेच त्यावर टॅक्स (Tax) भरावा लागतो. आणि जरी तुम्हाला ते दागिने विकून पैसे घ्यायचे असतील तर त्यावर घट धरली जाते तसेच त्यावरील मजुरी वाया जाते.

[metaslider id=4085 cssclass=””]

पण ETF द्वारे त्याची खरेदी पण सोपी आहे आणि विक्री देखील. तसेच त्यात साठवणुकीचा धोका कमी होतो. तसेच नफावसुली सहजपणे करता येते.त्यामुळे इंडेक्स ETF मधील गुंतवणूक ही विभागलेली(Diversified) म्हणजेच कमी जोखमीची असते. जरी काही शेअरनी चांगला परतावा दिला नाही तर जास्त नुकसान होत नाही.

इंडेक्स ETF हे स्टॉक निवड, मार्केट सेक्टर निवड तसेच फंड व्यवस्थापक निवड याच्यातील धोका कमी करतात म्हणजे एकच धोका राहतो तो म्हणजे निर्देशांकचा चढउतार.जर तुम्हाला एखादा ETF यूनिट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो ब्रोकर कडून खरेदी करावा लागतो तसेच त्यासाठी तुमचे demat खाते असणे गरजेचे असते. जर काही कालावधीसाथी निर्देशांक स्थिर राहिले तर यातून परतावा कमी मिळतो. तसेच निर्देशांकची घसरण झाल्यास त्यातून वजा परतावा मिळतो.

कोण गुंतवणूक करू शकतो :

भारतातील रहिवासी, एक अनिवासी भारतीय(Non-resident Indian) किंवा कंपनी, फर्म किंवा हिंदू अविभाजित कुटुंब भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकते. यासाठी त्याच्याकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे

पैसे काढण्याची पद्धत:

जर गुंतवणूकदारास कोणत्याही कारणास्तव पैसे काढण्याची गरज भासली असेल तर तो एक्सचेंजवर आपली युनिट्स विकू शकतो. त्या दिवशी युनिटच्या किंमतीनुसार, त्याला पैसे मिळतील.

सूचना :

ETF शेअर बाजाराशी निगडीत असल्याने कोणत्याही आश्वासन परताव्याची हमी देत ​​नाही.

हेही वाचा :

देशातील या बँकांचे आयएफएससी कोड बदलणार, एक जुलै पूर्वी करा ही कामे अन्यथा होईल आर्थिक नुकसान…!

जाणून घ्या : मटकी लागवडी ची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button