ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Investment Tips : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…

Investment Tips: Save Rs 100 per day and get Rs 10 lakh from Posta scheme

दैनंदिन आयुष्यात बचतीला फार महत्त्व आहे. या बचतीसाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबतो. त्यातील अनेकजण सुरक्षित पर्याय म्हणून फिक्स डिपॉझिटचा (FD) पर्याय निवडतात. ही एक प्रचलित गुंतवणुकीची योजना आहे. मात्र, सध्या या योजनेत गुंतवणुकीवर (On investment) मिळणारे व्याज दर (Interest rate) कमी झालेत. त्यामुळे अधिक चांगल्या परताव्यासाठी चांगलं व्याजदर असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं अधिक व्यावहार्य ठरणार आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

तसं केलं तरच कोरोनाच्या आर्थिक तंगीच्या काळात तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योजनांचा लाभ घेऊ शकता, पोस्ट योजनेचा चांगला परतावा तर मिळेलच पण परंतु आपल्या कष्टाचे पैशाची सिक्युरिटी देखील आहे.
चला तर आपण, पोस्टाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेविषयी माहिती घेऊयात..

सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund ) योजनेचा वार्षिक व्याज दर 7.1 टक्के आहे. यात आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करावे लागतील तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. (Invest Rs 100 per day in this post office scheme)

गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…

या योजनेमधील गुंतवणुकीचे फायदे…

आपण या योजनेत गुंतवणूक करता तेव्हा आपल्याला कलम 80 सी अंतर्गत कपातीचा लाभ मिळतो. व्याज उत्पन्न देखील पूर्णपणे करमुक्त आहे,तसेच मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त आहे.

याशिवाय तुम्ही पीपीएफमध्ये (In PPF) गुंतवणूक केलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आर्थिक वर्षापासून सहाव्या आर्थिक वर्षादरम्यान कर्जाची (Of debt) सुविधा उपलब्ध आहे.

‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…

योजनेचा कालावधी :

पोस्ट ऑफिस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा (Post Office Public Provident Fund) मॅच्युरिटी (Maturity) कालावधी 15 वर्षे आहे. त्यानंतरही आपण ही योजना सुरू ठेवू इच्छित असाल पाच वर्षाच्या ब्लॉक नंतर आपण रिन्यू देखील करू शकतो, या योजनेचा लाभार्थी होण्याकरिता, करणाऱ्या व्यक्ती भारतीय रहिवासी असावा तो या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकतो. योजनेचा लाभ आपण आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावे पालक पीपीएफ खाते उघडू शकतात.

15 लाख रुपये हवेत? कोणती आहे ही योजना व या योजनेत सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज…

उदाहरण:

एखाद्याने दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षांच्या मुदतीनंतर त्याला 989931 रुपये मिळेल. दररोज 100 रुपये जमा केल्यास वर्षात 36500 रुपये जमा केले जातील. अशा प्रकारे 15 वर्षातील एकूण ठेव रक्कम 547500 (10036515) रुपये असेल. या दरम्यान, व्याज उत्पन्न 442431 रुपये होईल. अशाप्रकारे मॅच्युरिटीची एकूण रक्कम 989931 रुपये असेल जी पूर्णपणे करमुक्त असेल.

हेही वाचा :

1. सावधान! डेल्टा-प्लस व्हेरिएंट आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडले डेल्टा-प्लस व्हेरिएंट रुग्ण वाचा सविस्तर बातमी…

2. नाशिक : यंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button