शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी (onion cultivation) तणनाशकांची गरज पडत असते. आपण पाहतो की कांदा लागवड (onion cultivation) ही तनांनी गच्च भरलेली असते. यातील तण काढण्यासाठी अधिक वेळ मेहनत करावी लागते. मुख्यतः कांदामधील तण हे खूपलहान असते हे काढताना कांदे रोपे बाजूला पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानिस सामोरे जावं लागतं. हे ओळखून अग्रगण्य कृषी कंपनी इंसेक्टिसाईड (Agricultural company Insecticide) (इंडिया) लिमिटेडने कांदा पिकासाठी ऑक्सिम (Oxim) तणनाशक बाजारात आणले आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..
वाचा –
ऑक्सिमची विक्री ‘ट्रॅक्टर ब्रँड’ अंतर्गत केली जाणार –
ऑक्सिमची विक्री कंपनीच्या लोकप्रिय ‘ट्रॅक्टर ब्रँड’ (Tractor brand) अंतर्गत केली जाईल. हे कांदा लागवड तणनाशक संकुचित आणि रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवेल असे सांगितले आहे.
वाचा –
शेतकऱ्यांकडून लाच घेताना “या” बँकेतील दोन अधिकारी सापडले जाळ्यात; या विभागाने पकडले रंगेहात, पहा पुढे काय झालं.. https://mieshetkari.com/two-officers-of-yaa-bank-were-caught-taking-bribe-from-farmers-this-department-caught-red-handed-see-what-happened-next/
ऑक्सिम तणनाशक कधी वापरायचे?
कांदा पिकाची लागवड (Cultivation onion crop) केल्यानंतर 15 – 20 दिवसांनी ऑक्सिम (Oxim) तणनाशक वापरले तरी चालेल. किंवा लागवडीनंतर दोन ते तीन पाणी दिल्यानंतर तणांचा अंदाज घेऊन तुम्ही या तणनाशकांची फवारणी करू शकता. ही वेळ योग्य ठरेल. काही भागांमध्ये खुरपणी केली जाते. खुरपणीला अधिक खर्च तसाच वेळही जातो. तसेच चांगली मेहनत घ्यावी लागते. कांदा लागवडीमध्ये चांगले उत्पन्न असले तरी कष्टाचे प्रमाणही अधिक आहे. हा सगळा शेतकऱ्यांचा त्रास वाचवण्यासाठी या कंपनीने ऑक्सिम (Oxim) तणनाशक बाजारात आणले आहे. आता लोकांची मेहनत खर्च होणार नाही.
इंसेक्टिसाईड (इंडिया) लि. चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र अग्रवाल म्हणाले की भारतामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे विविध तणनाशकांचा वापर केला जातो. हाच खर्च कमी करण्यासाठी ऑक्सिम (Oxim) तणनाशक मदत करेल तसेच उत्पादनामध्ये वाढही होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा