योजना

Loan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

Subsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सन 2020-21 या वर्षात आपल्या शेती (Agriculture) पिकांवर 3 लाख रूपयांचे कर्ज (Loan) घेणाऱ्या व त्या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यावरील व्याज (Interest) देण्यात येणार आहे. ज्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सोमवारी 10 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा:अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचेचं नाही, तर कापणी केलेल्या पिकाच्या नुकसानीसही मिळते भरपाई; त्वरित करा ‘या’ टोल फ्री नंबरवर कॉल

महत्त्वपूर्ण शासन निर्णय
राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदत व्याज सवलत देण्यासाठी पंजाबराव कृषी व्याज सवलत योजना राबवली जाते. याच योजनेत शासन निर्णय घेऊन अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी (Agriculture in Maharashtra) 4 लाखाचे अल्प मुदत पीक कर्ज (Crop Loan) घेतले आणि ते विहित मुदतीत परत केले तर शेतकऱ्यांना हे कर्ज शून्य व्याज दरात दिले जात आहे. पावसाळी अधिवेशनात उर्वणी मागणीसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ज्यापैकी यापूर्वी 48.72 कोटी इतका निधीचे वितरण देखील करण्यात आले आहे. आता 10 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय घेऊन 32.48 कोटींचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा: सरकारमुळेचं सोयाबीनचे दर दबावात! सरकारने ‘ही’ धोरणे बदलल्यानंतर वाढणार सोयाबीनचे दर

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार व्याज
शासनाच्या या निर्णयानंतर 2021-22 मध्ये घेतलेल्या 3 लाखांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार, 1 लाख, 2 लाख किंवा 3 लाखांपर्यंत कर्ज घेतले असेल. या सर्व घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाचे व्याज जमा केले जाणार आहे. यापूर्वी निधी अपुरा असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होण्यास विलंब झाला. मात्र आता निधी मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही व्याजाची रक्कम जम्मा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Interest money will be deposited in the account of regular borrowers, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button