कृषी सल्ला

कोबी व पानकोबी पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कोबी पिकास लागवडीपूर्व 80 किलो नत्र (Nitrogen) 80 किलो स्‍फूरद ( Phosphorous) व 80 किलो पालाश (Potassium) द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्‍याने 80 किलोचा नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा. तसेच फुलकोबीसाठी 75 किलो नत्र 75 किलो स्‍फूरद आणि 75 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्‍याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा.

लागवडीनंतर तिस-या दिवशी आाणि नंतर पुरेसा ओलावा राहील. अशा अंतराने जमिनीचा मगदूर पाहून पाण्‍याचा पाळया द्याव्‍यात. कोबी व फूलकोबीचे गडडे निघू लागल्‍यापासून गडडयांची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे व नंतर हलकेसे पाणी द्यावे.

हेही वाचा – गायीच्या शेणापासून बनलेला वेदिक पेंट आता बाजारात उपलब्ध होणार, तुमच्या घराच्या भिंती रंगवा..

किड व रोग

कोबीवर्गीय भाज्‍यांना मावा तुडतुडे फूलकिडे कोबीवरील अळी कॅबेज बटर फ्लाय (Cabege Butterfly) असे विविध किडींचा तसेच ब्‍लॅक लेग (Black Leg) क्‍लब रूट, घाण्‍या रोग, रोपे कोलमडणे, लिफ स्‍पॉट (Lief spot) या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

किडींच्‍या बदोबस्‍तासाठी रोपवाटीकेतीील रोपांपासून ते लागण झालेल्‍या भाज्‍यांवर एन्‍डोसल्‍फान 35 सीसी 290 मिली किंवा फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू एस सी 60 मिली किंवा मॅलेथिऑन 50 सीसी 250 मिली 250 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे. किडी व रोगाचे (pest and disease) एकत्रितरित्‍या नियंत्रण करण्‍यासाठी मॅलॅथिऑन (Malathion) 50 सीसी 500 मिली अधिक कॉपर ऑक्‍झक्‍लोराईड (Copper Oxychloride) 50 डब्‍ल्‍यूपी 1050 ग्रॅम् किंवा डायथेम एम( Dithem M) 45, 500 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. वरील किटक नाशकांच्‍या 2 ते 3 फवारण्‍या 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने कराव्‍यात

स्रोत – महाराष्ट्र कृषी विभाग

WEB TITLE: Integrated management of cabbage and cabbage crop

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button