फक्त 12 रुपयांत 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण; अगदी कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो..
माहितीअभावी लोक खासगी महागडे विमा (Insurance) घेतात. सध्याच्या काळात बरेच लोक विमा (Insurance) घेतात. स्वस्तात विमा कसा घ्यावा याविषयी पाहुया. आता फक्त 12 रुपयात विमा संरक्षण मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा (Prime Security Insurance) योजनेअंतर्गत फक्त 12 रुपयांत दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण (Insurance protection) मिळत आहे. कोरोना काळात शेतकरी, मध्यमवर्गीय लोक, गरजू लोक अगदी कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
फक्त 12 रुपयांमध्ये वर्षभरासाठी विमा संरक्षण –
प्रधानमंत्री सुरक्षा विमा (Prime Security Insurance) योजनेअंतर्गत बऱ्याच सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. गरजूंना या योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर ठरणार आहे. अगदी कोणीही 12 रुपयांत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेऊ शकते. 12 रुपयात वर्षभर विमा संरक्षण मिळते. या 12 रुपयांच्या विमा (Insurance) अंतर्गत जर दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळू शकतात. तसेच एखादी दुर्घटना झाली आणि त्यात अंपगत्व आले तर विम्याची रक्कम दिली जाते. त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नसते. तसेच काही काळासाठी अंपगत्व आले असेल तर एक लाख रुपये इतकी रक्कम मिळते. त्यामुळे गरजू लोकांना हा विमा फायद्याचा ठरतो आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या योजनेचा लाभ घेतल्यास सर्वसामान्यांचा चिंतेचा प्रश्न सुटल्याचा जमा असणार आहेत.
वाचा –
- केंद्र सरकारची घोषणा; सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांनो त्वरित किसान क्रेडिट कार्ड “असे” मिळवा..
या योजनेचे लाभार्थी –
1) 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्ती लाभ घेऊ शकतो.
2) ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते.
3) प्रत्येक वर्षी 31 मे रोजी या योजनेचे 12 रुपये बँक खात्यातून कापले जातात.
4) https://jansuraksha.gov.in/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर विमा योजनेचे फॉर्म आणि माहिती उपलब्ध आहे. हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बांगाली, कन्नड, ओडिया, तेलगू आणि तामिळ भाषेत दिला गेला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा