Insurance Companies Notice | कृषी विभगामार्फत दणका; ९ विमा कंपन्यांना नोटीस, शेतकऱ्यांची रक्कम तातडीने जमा करा, अन्यथा १२ टक्के व्याज!
Insurance Companies Notice | bump through the agriculture department; Notice to 9 insurance companies, deposit the amount of farmers immediately, otherwise 12 percent interest!
Insurance Companies Notice | महाराष्ट्रातील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना २१०५.१४ कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मंजूर झाली आहे. यापैकी ८३१ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित विमा कंपन्यांना नोटिसा (Insurance Companies Notice) काढून तातडीने रक्कम जमा केली नाही, तर १२ टक्के व्याजाने वसुली करू, तसेच कडक प्रशासकीय कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून या कंपन्यांनी पैसे थकविल्याची माहिती देत या कंपन्यांना सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे.
कृषी आयुक्तालयातून ओरिएंटल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स, एसबीआय इन्शुरन्स या कंपन्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
वाचा : Compensation For Damages | गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी ठरवली जाणार? जाणून घ्या सविस्तर…
केंद्र सरकारच्या पीकविम्याबाबत मार्गदर्शक सूचना २०२० मध्ये जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यांच्या आत नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा, उशिरा होणाऱ्या रकमेवर विमा कंपन्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १२ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे.
कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, तातडीने नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा. अन्यथा, नियमाप्रमाणे १२ टक्के व्याजदराप्रमाणे विलंब शुल्कासह भरपाई द्यावी.
हा इशारा समजल्यानंतर विमा कंपन्या रक्कम जमा करण्याच्या तयारीत आहेत.
Web Title : Insurance Companies Notice | bump through the agriculture department; Notice to 9 insurance companies, deposit the amount of farmers immediately, otherwise 12 percent interest!