कृषी बातम्या

Crop Insurance | अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई! प्रशासनाकडून ‘या’ तारखेपूर्वी रक्कम वाटप करण्याचे निर्देश

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून तब्बल 3 हजार 501 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात ही नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही आर्थिक (Financial) मदत वाटप करण्यास का विलंब होत आहे. हे जाणून घेऊयात. ज्यासाठी आता प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांच्या पिकाचा धोका वाढला! महाराष्ट्रासह देशातील या राज्यांना झोडपणार मेघराजा; हवामान विभागाचा इशारा

पीक विमा वितरीत करण्यास दिरंगाई
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई 3 हजार 501 कोटींचा निधी (Finance) वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासाठी शेतकऱ्यांना (Agriculture in Maharashtra) पात्र करून पीक नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादीही काढण्यात आली. कृषी सहायक, तलाठी कार्यालय, ग्राम सेवक संघटना यांना पात्र गावे पीक विमा वाटपासाठी देण्यात आली. मात्र, या संघटनांच्या माध्यमातून पीक विमा (Crop Insurance) वाटपास असमर्थता दर्शवून दिरंगाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीचा साडेतीन कोटींचा निधी वाटप

प्रशासन ऍक्शन मोडवर
विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) खात्यावर 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम 14 ऑक्टोबरपर्यंत जमा करावी असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाईची रक्कम झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. आता पीक विमा वाटपास झालेली हीच दिरंगाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून यावर ऍक्शन घेण्यात येणार आहे.

वाचा: स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी! आता सरकारही शेतकऱ्यांना देतंय ‘इतकं’ अनुदान; त्वरित करा अर्ज

14 ऑक्टोबरपूर्वी मदत वाटप करण्याचे निर्देश
प्रशासन सध्या पीक विमा वाटपाबाबत ऍक्शन मोडवर आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच 14 ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही दिरंगाई टाळण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश देऊन संघटनांशी बातचीत करून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Finally, compensation will be deposited in the farmers’ account! Directed by the Administration to distribute the amount before date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button