१)राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची घोडदौड सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे तर या दरवाढीने कहरच केला आहे. इथे 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत एक लिटर पेट्रोल मिळतंय. त्यापाठोपाठ आज परभणीतही पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटर अशी झाली आहे.
२)भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता.
३)कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार
हेही वाचा: पहा पीक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर..
४)लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात वीज पडून आणि पाण्यात वाहून जाऊन 19 जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. काल दुपारी लातूर शहर, लातूर ग्रामीणमधील जळकोट, निलंगा, औराद शहजानी, देवनी, अहमदपुर, चाकूर या तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
हेही वाचा: मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
५)ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला.
हेही वाचा
१) “वाराईच्या” माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते,शेतकर्यांची लूट वाचा…
२)हरभऱ्याचा दर कोरोनाच्या काळात ही टिकून पहा किती मिळतोय दर ….!