‘इ-पीक पाहणी’च्या आधारावर “इ-पंचनामा” चा उपक्रम; नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार..
Initiative of "e-Punchnama" on the basis of 'e-Peak survey'; Compensation will be credited directly to the farmer's account.
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक व उपयुक्त बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यावर वेळेत पंचनामा होतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना असते. त्यामुळे ‘ई- पीक पाहणी’ (E-Crop Survey) प्रमाणेच आता ‘ई-पंचनामा’ (E-Punchnama) हा उपक्रम राबवला जाणार आहे. ई-पंचनामा (E-Punchnama) विषयी सविस्तर माहिती घेऊया..
एकाच तलाठीकडे अनेक गावांचा कारभार असल्याने पीक पाहणी (Crop Survey) ही वेळेत होत नव्हती परिणामी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागत होते. यावर ‘ई-पीक पाहणी’ (E-Crop Survey) च्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. यानुसार आता ‘ई-पंचनामा’ (E-Punchnama) हा उपक्रम राबविला जाणार आहे.
पंचनाम्याची प्रक्रिया होणार व्यवस्थित –
अनेक शेतकऱ्यांनी (farmers) पिकांच्या नोंदी ह्या अचूक केल्या आहेत. पडताळणी व मान्यता देण्याचे अधिकार आता तलाठ्यांकडेच आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता ई-पीक (E crop) पाहणीमधून आलेल्या नोंदीतील पीक जर नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेले असल्यास त्याची पाहणी ई-पंचनामा (E-Punchnama) प्रणालीतून शेतकऱ्यांना देता येणे सहज शक्य होणार आहे.
वाचा –
प्रक्रिया –
या प्रक्रिये विषयी सविस्तर माहिती दिलेली नाही. तरी ‘ई-पंचनामा’ (E-Punchnama) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वतंत्र अॅप तयार केले जाणार आहे. जे ‘ई-पीक पाहणी’ (E-Crop Survey) च्या आधारावर तयार केले जाणार आहे. नुकसानग्रस्त पिकाचे फोटो काढून गट क्रमांक व अक्षांश-रेखांशच्या नोंदी ह्या स्वतः शेतकऱ्यालाच आपल्या मोबाईलमधून ऑनलाइन सादर करावे लागणार आहे. तलाठ्यांना ही माहिती तपासून अंतिम मान्यता देण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात.
प्रक्रिया होणार अधिक सोप्पी –
‘ई-पीक पाहणी’ (E-Crop Survey) या उपक्रमामुळे महसूल कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला होता. आता ‘ई- पंचनामा’ (E-Punchnama) हा उपक्रमही प्रत्यक्षात राबवण्यास सुरवात झाली तर या कर्मचाऱ्यांचा ताण अजून कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने स्वतः पंचनामा केला, त्याला तलाठ्यानी मान्यता दिली आणि ही मान्यता शासनाने गृहीत धरून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्याच्या (farmers) बॅंक खात्यात जमा केली जाणार.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –