ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

महाराष्ट्राच्या कृषी सल्ला विषयक माहिती; घ्या पिकांची अशी काळजी..

हवामान –

भारत मौसम विज्ञान विभाग यांनी आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. २४ व २८ सप्टेंबर रोजी हलक्या/मध्यम स्वरूपाच्या पावसाची सार्वत्रिक ठिकाणी शक्यता आहे. तर दि. २५ व २७ सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी व दि. २६ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या/मध्यम पावसाची शक्यता आहे. दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. विस्तारित स्वरूपाच्या हवामान अंदाज प्रणालीनुसार जिल्ह्यात दि. २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

वाचा –

कृषि सल्ला: (उडीद/सोयाबीन) कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा . साठवणुकीची व्यवस्था नसल्यास प्लास्टिक शीटने व्यवस्थित झाकून ठेवावा जेणेकरून पावसाच्या सरीपासून त्या शेतमालाचे संरक्षण होण्यास मदत होईल. शेतकरी बंधूंनी मुंग/ उडीद, सोयाबीन या पिकाचे शेत कापणीनंतर रबी हंगामातील पिकासाठी तयार करताना शेताच्या जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहील या पद्धतीने त्या शेताची मशागत करावी.

संक्षिप्त संदेश सल्ला: रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पावसाची उघडीप पाहून शेतजमीन तयार करून घ्यावी व बियाणे, खते आणि तणनाशके/कीटकनाशके/कीडनाशके/बुरशीनाशके यांची जुळवाजुळव करून घ्यावी.

पिक निहाय सल्ला –

कपाशी – ज्या भागात मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. निंदण करून पिक तणमुक्त ठेवावे. बोंडेबों डेभरण्याच्या अवस्थेत २ % डी.ए.पी. ची फवारणी करावी. फवारणी व निंदण कोरडे हवामान असताना करावीत.

मका –

मक्याचे पिक सध्या दुधाळ/ कणसे भरण्याच्या अवस्थेत असल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी शक्य नसल्याने नियमितपणे मजुरांच्या सहाय्याने अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
तूर -शेतात पावसाचे अतिरिक्त पाणी जास्त काळ साचून राहिल्यास तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येते. म्हणून साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करावा व त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड @ ५ ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रती लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून तुरीच्या झाडाला आळवणी करावी.

करंडई-

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करडीची पेरणी सप्टेंबरच्या चवथ्या आठवड्यात करावी. पेरणीसाठी एकेएस २०७, भीमा किंवा पिकेव्ही पिंक (एकेएस ३११) यापैकी एका वाणाची निवड करावी.

ज्वारी- रबी ज्वारीच्या पेरणीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी व पेरणी पावसाची उघडीप पाहून २५ सप्टेंबर नंतर करावी. पेरणीसाठी पिकेव्ही क्रांती, फुले यशोदा, मालदांडी ३५-१ यापैकी एका वाणाची निवड करावी.

सोयाबीन – जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कापणीला आले आहे. तरी शेतकरी बंधूंनी सोयाबीनच्या शेंगांचा रंग बदललेला असल्यास त्वरित कापणी करावी जेणेकरून परिपक्व झाल्यावर शेंगा खाली पडणार नाहीत आणि उत्पन्नात घट होणार नाही. कापणी केलेला शेतमाल गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा शेतात प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा.

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला –

कागदी लिंबू- लिंबू फळबागेच्या उताराच्या दिशेने पावसाचे साचलेले पाणी बाहेर काढावे कारण ज्याठिकाणी हे पाणी साचून राहते तिथे फायटोप्थोरा बुरशीची लागण अधिक होते.

वांगे- वांगी पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड या कीटकनाशकाची ३.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पाऊस नसताना कोरड्या वातावरणात करावी.

मिरची – सध्याच्या हवामान परिस्थितीत जिल्ह्यात काही भागात मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. याच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारणी पावसाचे पूर्वानुमान लक्षात घेऊन करावी.

सिताफळ – सीताफळ बागेत पावसाचे पाणी साचले असल्यास त्याचा योग्य मार्गाने निचरा करावा व पावसाची उघडीप पाहून बागेची आंतरमशागत करावी व बाग तणमुक्त ठेवावी.

पेरू- पेरू बागेत पावसाचे पाणी साचले असल्यास त्याचा योग्य मार्गाने निचरा करावा व पावसाची उघडीप पाहून बागेची आंतरमशागत करावी व बाग तणमुक्त ठेवावी.

संत्रा- संत्रा बागेतील फायटोप्थोराग्रस्त झाडांची फळगळ नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. @ ३ ग्रॅम प्रती ली. पाणी घेऊन फवारणी पाऊस नसताना करावी.

पशुधन विषयक निहाय सल्ला:

बकरा किंवा बकरी शेळ्यामध्ये पावसाळ्यात विशेषतः पोटात जंतूंची व परजीवींची वीं संख्या वाढते . त्यासाठी उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना जंतनाशकाची मात्रा देण्यात यावी.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button