ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Chief Minister Relief Fund | ‘या’ रुग्णांना मिळणार मुख्यमंत्री वैद्यकीय ‍सहाय्यता निधी ! जाणून घ्या योजनेबाबत अधिक

Chief Minister Relief Fund |राज्यातील बऱ्याच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पैशांच्या अभावाने आजरांवर उपचार घेणे शक्य होत नाही. यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका देखील अधिक असतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य ( CM Relief fund) केले जाते. यामध्ये अगोदर आपत्तीग्रस्त रुग्णांचा समावेश होता. तसेच काही ठराविक आजरांनाच अर्थसहाय्य केले जात होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय ‍सहाय्यता निधी

मात्र आता राज्यसरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. यामुळे सामान्य व गरीब वर्गातील नागरिकांना आपल्या आजारावर उपचार घेणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अर्थसाहाय्य मिळते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

या आजरांवरील उपचारासाठी मिळणार निधी

राज्य सरकारने कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, मेंदूचे आजार, यकृत प्रत्यारोपण, बालकांच्या शस्त्रक्रिया, हृदयरोग, किडणी प्रत्यारोपण, डायलिसिस, बोन मॅरो प्रत्यारोपण, अपघात, फुफ्फुस प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, नवजात शिशुंचे आजार, कर्करोग (केमोथेरपी), हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, अपघात शस्त्रक्रिया, विद्युत अपघात रुग्ण यांना उपचारासाठी अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

Important Documents | मुख्यमंत्री वैद्यकीय ‍सहाय्यता निधी मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१. अर्ज (विहीत नमुन्यात)

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी(बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

● मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठी किंवा याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क करा.

Email ID: [email protected] फोन – ९६१९९५१५१५ / संपर्क- ०२२-२२०२५५४०

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री : 8650567567

Information about Chief Minister Relief Fund

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button