‘ महागाईमुळे’, शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार ! पहा ‘किती ‘ रुपयांनी वाढणार खते?
'Inflation' will break farmers' necks! See 'How much' will fertilizer increase?
शेतकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत असतो. पण तरीही संकटास सामोरे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये असते,कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ, तर कधी कोरोना, तर कधी बाजार भाव यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यामध्ये अजून एका संकटाची भर शेतकऱ्यांवर पडली आहे ते म्हणजे शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतांमध्ये 40 ते 45 टक्के पर्यंत वाढ झाली आहे.
शेतामध्ये वापरण्यात येणारे डीएपी(DAP) डाय अमोनियम फॉस्फेटची 50 किलो खताच्या गोणीची किंमत 1200 वरुन 1900 रुपये झाली आहे. 10:26:26 ची किंमत 1,175 वरुन 1,775 रुपये प्रति गोणी, 12:32:16 ची किंमत 1,185 रुपयांवरुन 1,800 रुपये प्रति गोणी आणि 20:20:0:13 ची किंमत 925 वरुन 1,350 रुपये प्रति. नवीन एक एप्रिल रोजी चालू करण्यात आले आहेत असे इफकोच्या पत्रकावर म्हंटले आहे.
दोन वर्षापासून येणारे सततच्या संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेती खतांमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकटाची कुऱ्हाड कोसळणार आहे, या दरवाढीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे व त्याकरता रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
इफकोनं माध्यमांमध्ये डीएपीच्या किंमती वाढवल्याचा ज्या बातम्या येत आहेत, त्या निराधार असल्याचं म्हटलं आहे. आमच्याकडे रासायनिक खत शिल्लक आहे व शेतकऱ्यांना डीएपी जुन्या किंमतीला मिळेल, इफको सचिव डॉ.यू.एस. अवस्थी म्हटलं आहे. असे दरवाढीचे परिपत्रक का जाहीर करण्यात आले या प्रश्नाच्या उत्तराला इफकोकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.