महापुरात तसेच पावसामुळे सोयाबीन पिकावर (soybean crop) मोठ्या प्रमाणात तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून आला. भरपूर ठिकाणी सोयाबीनचे नुकसान देखील झाले. तांबेऱ्याचे नियंत्रण (Control of copper) करण्यासाठी त्यावर उपाय योजना वेळीच करायला हव्या. उत्पादनासाठी सोयाबीन पिकांची (soybean crops) काळजीही तशीच घ्यावी लागते. महापुरात झालेल्या पिकाच्या नुकसानीतून शेतकरी (Farmers) बाहेर पडला नाही तोपर्यंत पुन्हा सोयाबीन पिकाच्या तांबेरा (Tambera of soybean crop) रोगामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे.
तांबेऱ्याचे प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा खराब होतात आणि उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंतची लक्षणीय घट दिसून येते. या तांबेरा रोगावर नियंत्रण (Disease control) करायचे कसे आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
सोयाबीनचे फायदे –
कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन (income) देणारे सोयाबीन पिकाची झपाट्याने होतेय. सोयाबीनमध्ये १८-२० टक्के तेलाचे आणि ३८-४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार (Nutritious diet) म्हणून उपयोग केला जातो.
नियंत्रण कसे कराल?
1) या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव उपयुक्त उपाय आहे. उदा, फुले कल्याणी (डी. एस.२२८), फुले अग्रणी (के.डी. एस.३४४) व फुले संगम(के.डी. एस.७२६)
2) या अशा ठिकाणी सोयाबीन पिकाची (soybean crops) पेरणी लवकर १५-२५ मे च्या दरम्यान करावी. त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पिक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून वाचेल.
3) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोण्याझोल २५% प्रवाही १० मिली. किंवा हेक्झाकोण्याझोल ५ % प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा