योजना

Individual Farms | वैयक्तिक शेततळ्यांसाठी ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रक्रिया

Farmers of 'Ya' district are invited to apply online for individual farms, know the process

Individual Farms | पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना – मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत अनुदान देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संगणकीय प्रणालीवर अर्ज करावे लागतील.

पुणे जिल्ह्यासाठी या योजनेमध्ये सन २०२३-२४ या वर्षासाठी ४ कोटी ४४ लाख ४४ हजार रुपये इतक्या रकमेचा आर्थिकक लक्षांक देण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत विविध ८ आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

वाचा : Agriculture Irrigation Scheme | खुशखबर! आता ‘कृषी सिंचन योजने’अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे; अनुदानात 50 टक्के वाढ

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे:
शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
शेताची मालकी शेतकऱ्याच्या नावे असावी.
शेतातील जमीन सिंचनायोग्य असावी.
शेतकरी यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे:

शेतकरी ओळखपत्र (आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड इ.)
जमीन मालकीचे पुरावे (सातबारा उतारा, ८ अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र इ.)
सिंचनाची गरज असल्याचे पुरावे (पाण्याचे स्रोत, सिंचन पद्धत इ.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, त्यांच्या अर्जाची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवली जाईल. अर्जाची तपासणी झाल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर, शेतकऱ्यांनी काम पूर्ण करून त्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावी. काम पूर्ण झाल्यानंतर, शेतकऱ्यांना अनुदान थेट बँक खात्यामध्ये अदा करण्यात येईल.

या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे. या योजनेमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers of ‘Ya’ district are invited to apply online for individual farms, know the process

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button