पशुसंवर्धन

भारतातील पहिले इ-फिश मार्केट अँप लॉन्च; मत्स्यपालन शेतकऱ्यांना होणार फायदा, तो कसा? पहा सविस्तर..

मत्स्यपालन (Fisheries) हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न काढू शकतो. या उत्पनांसाठी बाजार व्यवस्था व्यवस्थित असणे गरजेच्या आहेत. आसाम मध्ये देशातील पहिल्या इफिश मार्केट ॲप लॉन्च (EFish Market app launch) करण्यात आले आहे. आसामचे मत्स्यपालन मंत्री (Minister of Fisheries) परिमल सुका वैद्य यांच्या हस्ते हे अँप लॉन्च करण्यात आले. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

अँप विषयी माहिती –

विक्री व्यवस्थेतील मध्यस्थी लोकांची असलेली गरज संपेल. उत्पादकांना मार्केट कुठे उपलब्ध आहे याची माहिती होणार आहे. तसेच विक्रेत्यांना योग्य मालाची पारख करता येणार आहे. फिश मार्केट (Fish Market) अँपला एक्वा ब्ल्यू ग्लोबल ऍक्वाकल्चर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Blue Global Aquaculture Solutions Pvt) द्वारा राज्याच्या मत्स्य विभागाच्या (Department of Fisheries) मदतीने तयार करण्यात आले आहे. याद्वारे मत्स्यशेतीसाठी वन स्टॉप समाधान, खरेदीदार आणि विक्रेता, दोन्हींना मत्स्य, जलिया कृषी उपकरण आणि औषधी, मत्स्यखाद्य आणि मत्स्यबीज ऑनलाईन ऑर्डर आणि विक्री साठी मदत मिळू शकणार आहे.

वाचा –

ऑनलाईन अँप द्वारे माहिती –

आता या ॲप द्वारे ऑनलाईन (online) याची खरेदी शक्य होणार आहे. याच्या मदतीने शेतकऱ्यांना (farmers) घरबसल्या गोष्टींचे सर्व माहिती मिळणार आहे. यामध्ये गोठलेले मासे, कोरडे मासे तसेच माशांचे लोणचे आणि गोड्या पाण्यातील प्रक्रिया केलेले मासे त्यांची माहिती देखील असणार आहे. मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या (farmers) त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button