भारतीय हवामानाचा अंदाज; पुढील काही दिवस पिकांची “अशी” घ्या काळजी, जाणून घ्या कृषी सल्ला सविस्तर..
हवामान – भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार दि. १ऑक्टोबर रोजी बहुतांश ठिकाणी तर दि. २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत स्वरुपाच्या हवामान अंदाज प्रणालीनुसार जिल्ह्यात दिनांक ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
कृषि सल्ला:
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांत झालेल्या मध्यम ते जास्त पावसाचे शेतात साचलेले पाणी योग्य पद्धतीने बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. शेतकरी बंधूंनी मुंग/उडीद या पिकाचे शेत कापणीनंतर रबी हंगामातील पिकासाठी तयार करताना शेतजमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहील या पद्धतीने त्या शेताची मशागत करावी.
वाचा –
संदेश सल्ला:
वेळेवर पेरलेले सोयाबीन पिक बऱ्याच ठिकाणी कापणीला आले आहे. तरी शेतकरी बंधूंनी सोयाबीनची कापणी पावसाचा अंदाज पाहून करावी जेणेकरून पावसामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट होणार नाही.
पिक निहाय सल्ला –
कपाशी – कपाशीच्या शेतात मागील मध्यम ते जास्त पावसाचे अतिरिक्त पाणी साचलेले असल्यास त्याचा योग्य वाटेने निचरा करावा. कारण हे पाणी जास्त काळ शेतात साचून राहिले तर कपाशीची पाते व फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
मका – मक्याचे पिक सध्या दुधाळ/ कणसे भरण्याच्या अवस्थेत असल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी शक्य नसल्याने नियमितपणे मजुरांच्या सहाय्याने अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
वाचा –
तूर – ज्याठिकाणी गत काही दिवसांत मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी तूर पिकात मर रोगाचा किंवा मूळकुज या रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास अशा ठिकाणी कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून तुरीच्या झाडाला आळवणी करावी.
सोयाबीन- लवकर परिपक्व होणाऱ्या जाती ज्याठिकाणी पेरलेल्या आहेत त्याठिकाणचे सोयाबीन कापणीला आले आहे. तरी शेतकरी बंधूंनी सोयाबीनच्या शेंगांचा रंग बदललेला असल्यास त्वरित कापणी करावी जेणेकरून परिपक्व झाल्यावर शेंगा खाली पडणार नाहीत आणि उत्पन्नात घट होणार नाही. शेतकरी बंधूंनी कापणी केलेले सोयाबीनचे पिक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व संबंधित शेतमाल टारपोलीन शीटने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.
ज्वारी- ज्या शेतकऱ्यांनी रबी ज्वारीच्या पेरणीसाठी शेत तयार केले आहे त्यांनी पेरणी करताना पावसाचा अंदाज व हवामानाची सद्यस्थिती याची खात्री करून घ्यावी.
फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला-
कागदी – लिंबू लिंबू फळबागेत पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच फळझाडांची आळे तणमुक्त ठेवावीत.
वांगे- वांगी या भाजीपाला पिकामध्ये फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ४-६ कामगंध सापळे लावावेत. फळे पोखरणाऱ्या अळ्यांनी आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास स्पिनोसॅड ३.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वाचा –
मिरची- फळे कुजणे आणि फांद्या वाळणे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दमट हवेत जास्त प्रमाणात आढळतो. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे.
सिताफळ- सीताफळ बागेत पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच फळझाडांची आळे तणमुक्त ठेवावीत.
पेरू – पेरू फळबागेत पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच फळझाडांची आळे तणमुक्त ठेवावीत.
संत्रा- फळगळ कमी करण्याकरिता १५० ग्रॅम जिब्रेलिक आम्ल + कार्बनडेन्झीम ५० डब्ल्यू.पी. १०० ग्रॅम या प्रमाणात १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुधन विषयक निहाय सल्ला:
बकरा किंवा बकरी- पावसाळ्यात शेळ्यांमध्ये पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे जखमा होतात. अशा जखमा झाल्यास शेळ्यांना धनुर्वात होतो. त्यासाठी शेळ्यांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा आणि जखम पोटॅशिअम परमॅगनेटने धुवावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा