ताज्या बातम्या

आज 6 ते 4 या वेळेत भारत बंद; संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन सीमेवर, पोलिसांकडून वाढवली सुरक्षा व्यवस्था..

केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं आज ‘भारत बंद’ (bharat bandh) ची हाक दिली आहे. मागील जवळपास दीड वर्षांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (farmer protest) करत आहे, हे आपल्याला माहीत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या (Three new agricultural act) विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukta Kisan Morcha) आज ‘भारत बंद’ची (Bharat Bandh) घोषणा केली. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवली –

आजच्या भारत बंदमुळे (bharat bandh) काही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत बंदच्या (bharat bandh) पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आजच्या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

वाचा –

इत्यादीं दुकाने, उद्योग बंद राहील –

आज बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होईल. सकाळी 6 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत बंद (band) पाळण्यात येणार आहे. या बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. सार्वजनिक कार्यक्रम देखील होणार नाहीत.

6 ते 4 भारत बंद

संयुक्त किसान मोर्चाने सांगितले आहे की आज (27 सप्टेंबर) सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारत बंदचं आयोजन करण्यात आले. रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा (Essential service) सुरू राहणार आहेत.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button