ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान
ट्रेंडिंग

Weather Update| शेतकऱ्यांची वाढली चिंता; राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार..

Weather Update | राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून प्रचंड उन्हाचा चटका जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी तापमानात विक्रमी वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. राज्यात पुन्हा पाऊस बरसणार असल्याने या उकड्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे.

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

आठवड्याच्या सुरुवातीलाच कोकणासह (Konkan) दक्षिण महाराष्ट्र (South Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) पावसाची शक्यता (Rainfall) आहे. राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई (Regional Meteorological Center, Mumbai) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच नाशिकसह (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे.

वाचा: खुशखबर.. कृषिपंपधारक शेतकर्‍यांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात जोरदार पावसासह आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी (8 मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

‘या’ दहा जिल्ह्यात पाऊस

मंगळवारी पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigarh), रत्नागिरी (Ratnagiri), सातारा (Satara), सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर (Kolhapur), बीड (Beed), परभणी (Parbhani) आणि हिंगोली (hingoli) या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुण्यासह (Pune) अहमदनगर (Ahmednagar), नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

पावसासाठी पोषक हवामान

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील 06 तासांत 15 किमी प्रतितास वेगानं उत्तर-वायव्य दिशेकडे सरकल्याने देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. याचाच परिणाम म्हणून तामिळनाडूचा किनारी प्रदेश, पुड्डुचेरी, कराईकल, दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button