ताज्या बातम्या

Income Tax Demand | मोदी सरकारची करदात्यांसाठी मोठी घोषणा! 1 लाख रुपयांपर्यंतची कर थकबाकी माफ; वाचा निर्णय काय?

Income Tax Demand | Modi government's big announcement for taxpayers! Waiver of tax arrears up to Rs 1 lakh; What is the decision to read?

Income Tax Demand | एक लाख रुपयांपर्यंतची कर थकबाकी असलेल्या एक कोटीहून अधिक करदात्यांना (Income Tax Demand) मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने 13 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 31 जानेवारी 2024 पर्यंत जुन्या थकबाकी कर दाव्याच्या मागण्या माफ केल्या आहेत.

या निर्णयानुसार, आर्थिक वर्ष 2020-11 साठी 25,000 रुपये आणि आर्थिक वर्ष 2011-12 ते 2015-16 पर्यंत प्रत्येक वर्षी 10,000 रुपये अशा थकबाकी माफ करण्यात येतील. मात्र, एका करदात्याला मिळणारी माफीची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल.

या निर्णयामुळे देशभरातील अनेक करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. यात लहान व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा समावेश आहे. या निर्णयाचे स्वागत करताना, कर तज्ञांनी म्हटले आहे की, हे करदात्यांसाठी एक चांगले पाऊल आहे आणि त्यामुळे कर अनुपालन सुधारण्यास मदत होईल.

वाचा | PM Surya Ghar Yojana | भारीच की! शेतकऱ्यांना 300 युनिटपर्यंत मोफत मिळणार वीज, 1 कोटी घरांना मिळणार लाभ

  • या निर्णयाचे काही मुख्य मुद्दे
  • 1 लाख रुपयांपर्यंतची कर थकबाकी माफ
  • 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या थकबाकीचा समावेश
  • एका करदात्याला मिळणारी माफीची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल
  • 2 महिन्यांत आदेशाची अंमलबजावणी

अर्थमंत्र्यांची घोषणा
1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 25,000 रुपयांपर्यंत थेट कराची मागणी मागे घेण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा एक कोटी करदात्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Web Title | Income Tax Demand | Modi government’s big announcement for taxpayers! Waiver of tax arrears up to Rs 1 lakh; What is the decision to read?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button