कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!
Include in the diet to boost immunity during the corona period, these "fruits" will have many benefits!
कोणत्याही रोगावर मात करण्यासाठी रोग प्रतिकार क्षमता असणे आवश्यक आहे, त्याकरता उत्कृष्ट आहार तसेच ताज्या फळांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामधून आपल्याला जीवनसत्वे, खनिजे,फायबर,प्रथिने आणि अँटीऑक्सीडेंट मिळतील असे आहार यांचा समावेश करावा.
उन्हाळ्यामध्ये शक्यतो आंबा, सफरचंद ,केळी आणि बीट हे पदार्थ खाणे आवश्यक आहे. याच बरोबर हिरव्या भाज्या ,रताळे, शेंगदाणे, मका, बाजरी यांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. तसेच दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. आहारासोबत चांगली झोपही घेणे आवश्यक आहे, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती आणखीन वाढण्यास मदत मिळते.
राजमा मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने समाविष्ट असतात आपण राज्म्याचे विविध पदार्थ करून देखील करून मग खाऊ शकतो, उदाहरणार्थ राजम्याची भाजी,राजम्याची सूप, यामुळे शरीरातील प्रथिने ची पातळी चांगली राहतील.
रोज सकाळी व संध्याकाळी दूध पिणे आवश्यक आहे . दूध आहारातील महत्त्वाचा भाग आहे दुधामुळे कार्ब प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहे . म्हणून दुधाचा आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.
आंब्यामध्ये ए,बी,सी अशी जीवनसत्व असतात याशिवाय आंब्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक व वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक पाहायला मिळतात आंब्यामध्ये शर्करा असल्याने शरीरात ऊर्जा मिळते, आंब्याचे देखील विविध पदार्थ करून आपण आहारात समाविष्ट करू शकतो. उदाहरणार्थ आंब्याचा मिल्क शेक, कैरीचे पन्हे यासारख्या गोष्टी अधिक फायदेशीर ठरतात त्यामुळे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. केळी मध्ये पोटॅशियम असते केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात व शिरला हायड्रोट्रेड ठेवण्यास मदत करतात केळीमध्ये 100 कॅलरी ऊर्जा असते त्यामुळे दिवसभर शरीर स्फूर्तीवान राहते. त्यामुळे रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हे हि वाचा
१) असे करा कांदा पिकाचे व्यवस्थापन
२) शेतकरी कुटुंबातील सुनेची जिद्दीची कहाणी वाचा ही यशोगाथा…