कृषी बातम्या

Subsidy | ब्रेकिंग न्यूज: प्रोत्साहन अनुदानास आज शुभारंभ: कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले शेतकरी असणार आहेत लाभार्थी? तर निकष ही पहा…

Subsidy | अनुदानाच्या शुभारंभ आज होणार –

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 | हजार रुपये प्रोत्साहन अनुदान सरकारने जाहीर केले होते. या येाजनेचा शुभारंभ आज (20 ऑक्टोबर) होणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमला सहकारमंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

7.15 लाख पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र-

ज्या शेतकऱ्यांनी साल 2017 – 18, 2018 19, आणि 2019 20, या तीन आर्थिक वर्षातील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन विहित कालावधीत कर्जफेड(Agricultural Information) केले असल्यास ते शेतकरी 50 हजार रुपये अनुदान मिळण्यास पात्र आहेत.आतापर्यंत सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. आजच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत Lifestyle अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सावे यांनी दिली.

वाचा: बंगालच्या उपसागरात तयार होतय मोठ चक्रीवादळ: या ठिकाणी पावसाच्या जोर राहणार कायम; घ्या आपल्या पिकांची काळजी…

या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष आहेत –

• कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
• या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
• सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळं नुकसान झाल्यानं(Agricultural Information) नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी Lifestyle देखील या योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस देखील प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

तुमच्या खात्यावर पोहचले नाहीत 2 हजार रुपये..? नसतील पोहचले तर करा या नंबरवर फोन

योजनेची कार्यपद्धती अशाप्रकारे आहे –

  1. या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड (Agricultural Information)करण्यात आली आहे.
  2. या प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
  3. पात्र लाभार्थींच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधीत बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
  4. सदर यादीमधील संबंधीत शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं.
  5. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा Lifestyle लाभ निर्गमित करण्यात येईल.

वाचा: अखेर समजल हा! ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना; जाणून घ्या सविस्तर बातमी…

योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र शेतकरी –

  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  2. महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य
  3. केंद्र सरकार व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारापेक्षा अधिक असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर(Agricultural Information) भरणाऱ्या व्यक्ती.
  6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून)
  7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ).

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking News: Incentive Grant Launched Today: In Which Year Loan Borrowers Will Be Beneficiaries? So look at the criteria…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button