lang="en-US"> अर्थसंकल्पात 2 राज्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा, सिंचनासाठी तब्बल

अर्थसंकल्पात 2 राज्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा, सिंचनासाठी तब्बल 44,605 कोटींची तरतूद..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच्या अर्थसंकल्पात (budget) सरकार (government) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. याबाबद केंद्र सरकार (Central government) ९० % खर्च करणार आहे. केन-बेतवा नद्या जोड प्रकल्पासाठी ४४ हजार ६०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील एकूण १३ जिल्ह्यांना फायदा होणार असल्याचे संसदेत सांगितले.

वाचा – अर्थसंकल्पानंतर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या खात्यात 2.25 लाख कोटीं रुपयांपेक्षा अधिक पैसे..

1980 मध्ये केंद्र सरकारने (central govrnment) जलसंसाधन विकासासाठी एक योजना तयार केली होती. याअंतर्गत राष्ट्रीय जल विकास संस्था तयार करण्यात आली होती. यामध्ये 30 नद्यांची निवड करण्यात आली होती. यानुसार जलसिंचन, पिण्याचे पाणी व वीज उत्पादनात मदत होणार होती. यामध्ये हिमालयातून निघणाऱ्या १४ तर पठारावरील १६ नद्यांचा समावेश होता आणि यातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील केन-बेतवा या नद्यासुद्धा जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वाचा – डिजिटल मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आकारला जाणार ३० टक्के कर; नव्या अर्थसंकल्पातील नव्या घोषणा….

बुंदेलखंडमधील १०.६२ लाख हेक्टर क्षेत्रात या योजनेने सिंचनाची सुविधा पोहोचणार आहे. सोबत ६२ लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. याशिवाय १०३ मेगावॅट वीज निर्मितीसुद्धा होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version