अबब! 22 कोटींचा विविध योजनांचा लोकवाटा मधल्या मध्ये कृषी अधिकाऱ्यांनी लाटला? काय आहे बातमी
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी आणलेल्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी भरलेल्या 22 कोटी रुपयांच्या लोकवाट्यावर कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांनी मधल्यामध्ये लोकवाटा हडप केला आहे. अश्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. असे आदेश कृषी आयुक्त त्यांनी दिलेले आहेत.
कृषी उद्योग विकास महामंडळाने राज्य पुरस्कृत योजनांमधील अनुदानावर विविध कृषी साधनांचा पुरवठा केला जातो. उपकरने मिळण्यासाठी आधी शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम लोकवाटा म्हणून कृषी खात्याकडे जमा करावी लागते. काही अधिकाऱ्यांनी ही रक्कम महामंडळाला न देता स्वतःकडे ठेवला असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. अडकलेली रक्कम कोटीच्या घरात आहे. साधारणपणे ती रक्कम 22 कोटीच्या घरात आहे. असा संशय आयुक्तांनी वक्त केला आहे. सर्वात जास्त लोकवाटा परभणी मध्ये साडेतीन कोटी रुपये इतका आहे. पुणे जिल्हा – सहा लाख, सातारा – सहा लाख, लातूर साडेतीन लाख सर्वात कमी रत्नागिरी एकेचालीस हजार अशी आकडेवारी पाहायला मिळते.
आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा मध्ये असे नमूद केले आहे. की तुमच्या तालुका कृषी अधिकारी कामे करतात. अधिकाऱ्यांना अनुदानावर अवजारे पुरवण्याचा पुरवठा आदेश या कृषी उद्योग मंडळाला दिला होता. मात्र अवजारे व साहित्याची विक्री होऊन देखील. लोकवाटा जमा केला नाही. याबाबत तत्काळ कारवाई करणे बाबत सूचना दिल्यानंतर, अंमलबजावणी झालेली नाही ही शेवटची संधी असून सात दिवसात लोकवाटा जमा करावा.
शेतकऱ्यांच्या लोकवाट्याला जमा न करता मध्येच गडब करणाऱ्या अधिकाऱ्यांचा,कर्मचाऱ्यांचा शोध लावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. दोषी अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी त्याचा प्रस्ताव देखील ला आहे.