
शेतकरी वर्गाच्या एखाद्या भाज्या चांगल्या दरात आल्या की शेतकऱ्याचे चांगले दिवस येतात. रोजरोज दराला कंटाळून वाट पाहत बसलेला शेतकरी आज भाज्यांच्या दराने सुखवलेला दिसत आहे. एखादी भाजी चांगल्या दरात गेली की तोही खुश होतो व आणखी जास्त पिके पेरून उत्त्पन्न काढण्याचं त्याच्यात बळ येतं. पण या बळीराजाचे चांगले दिवस कधीतरी एखादाच येतो. जसा आज आलेला आहे.
अंबरनाथ तालुक्यात भेंडीचे सर्वाधिक उत्पादन काढलेले आहे. याने शेतकऱ्याला भेंडी दराच्या बाबतीत थोडा दिलासा मिळालेला दिसत आहे.
पावसाळ्यात भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जात असते. बाजारात शेतकऱ्यांकडून सफेद भेंडी १२० ते १४० रुपये प्रति किलोने विकत घेतली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेले आहेत असे दिसत आहे. सफेद भेंडीचे दर पाहून शेतकरीही आनंदात असल्याचं दिसत आहे.
सफेद भेंडीने बाजारात दराची शंभरी पार केली तसेच बाजारात किलोला १२० ते १४० रुपयांचा दर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले दिसत आहे. पावसाळ्यात माळरानावरील भाज्यांना पसंती भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन वाढलेले आहेत.
हे ही वाचा:
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: