कृषी बातम्या

महाराष्ट्र मध्ये, ‘मान्सून’ आगमन तरीही महाबीज बियाण्यांचा व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा…

In Maharashtra, despite the arrival of the 'monsoon', there is a huge shortage of seeds and chemical fertilizers.

राज्यामध्ये मान्सूनचे ( monsoon) आगमन झाले आहे, राज्यातील 80 टक्के जिल्ह्यांमध्ये मान्सून चे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी (Sowing) करण्यासाठी लगबग चालू झाले आहे. त्याकरता शेतकरी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना दिसत आहे. मात्र मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी महाबीज (Mahabeej) वितरणा कडून बियाण्यांचा पुरेसा पुरवठा होत नाही, तसेच रासायनिक खतांचा (Of chemical fertilizers) ही मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे.

हेही वाचा : सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

[metaslider id=4085 cssclass=””]

परभणी जिल्ह्यामध्ये महाबीज वितरणाकडून वेळेमध्ये बियाण्यांचा पुरवठा होत नाही, तसेच वाशिम मध्ये रासायनिक खतांचा अभाव आहे. त्यामुळे पेरणी लांबणीवर जाणार की काय अशी चिंता वाटू लागली आहे.

अनेक ठिकाणी बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे व खाजगी कंपनीचे बियाणे महाबीज वितरणाच्या बियाणे पेक्षा अधिक महाग असल्यामुळे, तसेच ते खात्रीशीर नसल्यामुळे शेतकरी मात्र काळजीत पडले आहे.
डीएपी, 10:26:26 या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.सदर खत कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर (At the Agricultural Service Center) उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाचा विचार करावा – डॉ. विद्या मानकर

तसेच कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना सोयाबीनचे लागवडीबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे.
खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची( soybean crop) पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या (University of Agriculture) निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे, नाहीतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी ला सामोरे जावे लागेल, होणारे नुकसान करण्याकरिता कृषी विभागानेही (Even the Department of Agriculture) शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :


1)अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…

2)शेतकरी हित हेच आमचे ध्येय’, आम्हाला विचारलेला मोलाचा प्रश्न, कुसुम सोलर पंप योजना कधी चालू होणार? याबाबत सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button