कृषी बातम्या

फक्त 55 गुंठ्यांमध्ये “या” शेतकऱ्याने काढले लाखोंमध्ये उत्पन्न; पहा कसे पिकांचे नियोजन..

कस्ट करण्याची तयारी व जिद्द ठेवली तर कोणती गोष्ट अवघड नसते. हे या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.फक्त 55 गुंठ्यांमध्ये दर वर्षी लाखोंचे उत्पन्न (income) काढणाऱ्या या शेतकऱ्याने (farmer) बाकी शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

वाचा –

प्रशांत वामन सांगळे या तरुण शेतकऱ्याने (farmer) आपल्या शेतात डाळिंबची 450 झाडांची लागवड केलेली आहे. तसेच केशर आंब्यांची झाडे 36 आहेत. यावर्षी कपाशीचीही लागवड केलेली आहे. ही शेती (Agriculture) माळावरच्या शेतात ठिबक सिंचनाची सोय करून हिरवीगार फुलवत आहेत. अशा माळावरच्या शेतात चांगली मेहनत घेत उत्पन्न (income) काढत आहेत. कांदा, उडीद या पिकांचेही चांगले उत्पादन अशा ठिकाणे घेतात. आपण डाळिंब या पिकांचे उत्पादन पाहुया..

डाळिंबाचे उत्पन्न –

भगव्या जातीच्या डाळिंबाच्या झाडांना स्लरी, जीवामृत, तसेच शेणखत दिले जाते. जेणेकरून डाळिंबांची चमक व रंग सुधारण्यास चांगलीच मदत होईल. हेच उपाय या शेतकऱ्याने डाळिंब सुधारणीत वापरले. फळांचे वजन ५०० ते ६०० ग्रॅमपर्यंत चांगले वाढले होते. त्यामुळे डाळिंब फळाला दरही चांगला मिळाल्याचे सांगितले.

वाचा –

औजारांपासून उत्पन्न –

सध्या सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर सर्वांचाच भर असल्याने, त्यांची गरज ओळखून पेरणी, कोळपणी, रोटर, मळणी यंत्र, कांद्यासाठी सरी यंत्र, गादीवाफा यंत्र अशी यंत्रे भाडेतत्त्वावर देऊन शेतकऱ्यांची ऐन वेळची गरज पूर्ण केली. त्यामुळे या औजारांपासून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास मदत झाल्याचे प्रशांत या शेतकऱ्याने सांगितले. खते, कीडनाशकांच्या फवारणीसाठी विविध औषधांच्या मात्रा तयार करणे, त्यांची फवारणी करणे, ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील विविध प्रकारची कामे पत्नी ज्योत्स्ना अगदी सहजपणे करत असल्याची माहितीही प्रशांतने दिली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button