कृषी बातम्या

नगरमध्ये पंधरा दिवसात तुरीच्या दारामध्ये झाली मोठी वाढ! ‘इतके’ दर आहेत तुरीला..

In fifteen days there was a great increase in the city! There are so many rates for Turi ..

सोयाबीनच्या नंतर आता तुरीच्या दरामध्ये राज्यात वाढ झालेली दिसू लागली आहे.याआधी हरभरा,सोयाबीनला तेजी आली आहे. काही ठिकाणी तुरीला तब्बल सात हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे. तर लातूर मध्ये तुरीला 6000 च्या पुढे रुपये प्रति क्विंटल भाव मिळताना दिसते आहे. दररोज 100 ते 125 रुपयांनी ही भाव वाढ होत आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न समितीमध्ये, तसेच जिल्ह्यामध्ये तुरीचे दर टिकून आहेत. सध्या नगरमध्ये सहा हजार ते सहा हजार तीनशे इतका भाव मिळत आहे. मागील दोन महिन्यात तुरीचा भाव 5000 इतका होता मात्र यामहिन्यात चांगलाच दर वाढला आहे.

बाजारात हमी भावापेक्षा प्रथमच तुरीला जास्त भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करून देखील हमीभावाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. दर वाढीत सुधारणा झाल्यामुळे बाजारात तुरीची आवक हळूहळू वाढत आहे.

यावर्षीच्या हंगामात तुरीचे पाहिजे इतके उत्पादन झाले नसल्यामुळे ही भाव वाढ झाल्याचे दिसून येते. लवकरच तूर साडेसात हजार रुपयांचा टप्पा गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button