ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार!

In case of fraud in online shopping, register your complaint 'here'!

अलीकडील काळामध्ये, ऑनलाईन (Online) शॉपिंगचे (Of shopping) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, या शॉपिंग मध्ये बरेचदा मोठे डिस्काउंट (Discount) मिळत असल्याकारणाने तसेच घरपोच सेवा उपलब्ध (Home delivery service available) असल्याकारणाने बरेचदा अनेक लोक ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) करण्यास पसंती देतात. परंतु अशा ऑनलाइन शॉपिंग मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फसवणूक (Cheating) केली होते, डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जाते, ब्रँडेड (Branded) म्हणून वस्तूचे चुकीची स्पेलिंग लिहून ग्राहकांना फसवले जाते, काही वेळेला पेमेंट घेऊन सुद्धा वस्तू घरपोच मिळत नाही, सामानामध्ये काही समस्या असल्यानंतरही कंपनी ते रिटर्न घेत नाही. असे एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी फसवणूक झाल्यास कोठे तक्रार करायची हे माहीत असणे आवश्यक आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

ऑनलाइन शॉपिंगमध्ये तुमची फसवणूक झाल्यास म्हणजेच कंपनी आपले म्हणणे ऐकत नसेल तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकता. यासाठी सरकारची एक नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन (National Consumer Helpline) आहे, जिथे आपण अशा गोष्टींबद्दल तक्रार करू शकता. जेणेकरून तुमच्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण होईल यासाठी नॅशनल कंजूमर हेल्पलाइन मदत करेल.

‘इथे’ करा तक्रार?

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन मध्ये आपण झालेली फसवणूक किंवा त्या कंपनीच्या विरुद्ध तक्रार नोंदणी करू शकता. तक्रार नोंदवल्यास (If a complaint is lodged) प्रकरण निकाली निघाल्याची आणि आपली आवडती वस्तू किंवा त्यांचे पैसे परत मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

आपण राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या (Of the National Consumer Helpline) नोंदणी क्रमांकावर 1800-11-4000 किंवा 14404 वर तक्रार करू शकता. 9.30 ते सकाळी 5.30 या वेळेत फोन करावा लागतो. याव्यतिरिक्त आपण 8130009809 या क्रमांकावर मॅसेज (Message) करु शकता. यासोबतच ऑनलाईन वेबसाईट https://consumerhelpline.gov.in/user/signup.php वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता.

तसेच अनेक ॲपच्या माध्यमातून देखील आपली तक्रार मांडू शकता जसे की,NCH APP, Consumer App, UMANG APP च्या माध्यमातूनही तक्रार करु शकता. तक्रार करण्याकरिता प्लॅटफॉर्मवर लॉगिन (Login to the platform) करून संपूर्ण माहिती भरावी, या प्लॅटफॉर्मवर आपल्याला एक आयडी तयार करावा लागेल. आयडी (ID) तयार झाल्यानंतर तुम्हाला एक तक्रार फॉर्म भरावा लागेल आपल्या खरेदीशी संबंधित प्रत्येक माहिती या फॉर्ममध्ये लिहावी लागेल, त्यानंतर लवकरच आपल्या तक्रारीवर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा:

1. शेणाच्या बदल्यात मिळेल “गॅस सिलेंडर” वाचा कुठे राबवली जाते ही भन्नाट योजना!

2. ‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button