शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…
In case of accidental death of farmers and agricultural laborers while farming, the government of this state will provide financial assistance.
बळीराजाचे जीवन चोवीस तास शेतामध्ये राबत असताना, धकाधकीचे व संकटाचे असते. कित्येक वेळा शेतामध्ये काम करत असताना सर्पदंशाने (Snake bites) अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, तर कधी कीटकनाशके (Pesticides) फवारणी करताना, पावसाळ्यामध्ये शेतामध्ये काम करत असल्यास वीज (Electricity) पडून मृत्युमुखी पडणारे शेतकऱ्यांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अस्मानी तसेच सुलतानी संकटे नेहमीच येत असतात.
हे ही वाचा : LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…
यासाठी हरियाणातील सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी (Financial assistance) मुख्यमंत्री शेतकरी आणि शेतमजूर जीवन सुरक्षा योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षा कवच (Safety shield) प्रदान होणार आहे.
मुख्यमंत्री शेतकरी आणि शेतमजूर जीवन सुरक्षा योजनेद्वारे (CM Farmers and Agricultural Workers Life Security Scheme) शेती काम करत असताना शेती, गाव, बाजार समिती अशा ठिकाणांहून येताना जाताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार आहे.
आर्थिक सहाय्य (Financial assistance) मिळेल
शेतीशी संबंधित अवजारासोबत काम करताना अपघात झाल्यास, धान्य करण्याच्या उपणेर (Thresher) चालवताना अपघात झाल्यास,पिकांवर किटनाशक (Pesticides) किंवा इतर औषधं मारताना मृत्यू
शेताला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीजेचा धक्का किंवा शेताला लागलेल्या आगीत मृत्यू
शेतात काम करत असताना साप किंवा इतर विषारी प्राणी चावून मृत्यू झाल्यास आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.
अपघाती मृत्यू (Accidental death) झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मिळणार असून, पाठीचा मणका मोडल्यास किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2,50,000 रुपये. तसेचशरीराच्या 2 अवयवांची मोडतोड झाल्यास किंवा गंभीर जखम झाल्यास 1,87,500 रुपये.
एका अवयवाची मोडतोड किंवा कायमस्वरुपीची जखम झाल्यास 1,25,000 रुपये. एवढ्या रुपयांची आर्थिक सहाय्य हरियाणा सरकारने जाहीर केले आहे.
हे ही वाचा :