महत्त्वाचे, LPG गॅस सिलेंडरवर मिळणार कॅशबॅक; बुकिंग करा व असा मिळवा रिवॉर्ड..
सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. LPG गॅस सिलेंडरच्या खर्चातून काही रक्कम कमी करू इच्छित असाल तर ही बातमी सामान्य लोकांसाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला महागड्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांपर्यंतचा निश्चित कॅशबॅक मिळू शकतो. सध्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. यामध्ये तुम्ही 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. ती कशी? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर; यादिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे…
असा मिळवा कॅशबॅक –
डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या पॉकेट्स अॅपद्वारे ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकिंगवर 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारे 200 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गॅस बुकिंगसह कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल.
ही ऑफर फक्त पॉकेट्स अॅपद्वारे महिन्याच्या 3 बिल पेमेंटवर वैध असेल.
वाचा –
अशी करा बुकिंग –
- तुम्हाला तुमचे पॉकेट्स वॉलेट अॅप उघडावे लागेल.
- यानंतर, रिचार्ज आणि पे बिल्स सेक्शनमध्ये पे बिल वर क्लिक करा.
- यानंतर Choose Billers मध्ये More चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- यानंतर LPG चा पर्याय तुमच्या समोर येईल.
- आता सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करावी लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- आता तुमच्या बुकिंगची रक्कम प्रणालीद्वारे कळवली जाईल.
- यानंतर तुम्हाला बुकिंगची रक्कम भरावी लागेल.
- व्यवहारानंतर 10 टक्के दराने जास्तीत जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल. तो उघडताच कॅशबॅकची रक्कम तुमच्या पॉकेट्स वॉलेटमध्ये जमा केली जाईल. हा कॅशबॅक बँक खात्यात देखील ट्रान्सफर केला जाऊ शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा