कृषी बातम्या

महत्त्वाची बातमी! कृषी विभागकडून घेण्यात येणारे पिकांच्या प्रात्यक्षिकला 24 कोटीचे अनुदान मंजूर, पहा यामध्ये “तुमच्या जिल्ह्याचा” समावेश आहे का?

Important news! The Department of Agriculture has sanctioned a grant of Rs 24 crore for crop demonstrations. See if this includes "your district"?

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) कृषी विभागाच्या (Department of Agriculture) मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असते, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी असाच एक उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून (From the National Food Security Mission) विविध उपक्रम अंतर्गत पिकांचे प्रात्यक्षिक घेतले जात आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे शेतातील उत्पादन वाढवावे व आयात कमी करण्यात यावी असे त्याचे प्रमुख उद्दिष्ट असते.

असे प्रात्यक्षिक घेतअसताना त्याच्यामध्ये 20 ते 25 शेतकरी असतात, यावर्षी सोयाबीन (Soybeans) व तुरीचे 10000 हेक्टर चे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, या प्रात्यक्षिक यासाठी येणारा खर्च प्रति 9000 रुपये (money) खर्च केले जात आहेत आणि पीक पद्धती नुसार चार ते पाच प्रकारच्या पिकांचे प्रात्यक्षित घेतले जातात, त्यामध्ये प्रति हेक्टर (hectare) 15000 खर्च (expenses) केले जात आहेत. अशी माहिती कृषी विभाग (department of agriculture) कडून आलेली आहे.

हे ही वाचा : पावसाळी अधिवेशनात घेतले ‘शेतकऱ्यांच्या हिताचे’ महत्त्वाचे निर्णय! वाचा थोडक्यात अधिवेशनाचा आढावा…

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान पुढील कारणास्तव त्याचा वापर करता येतो जैविक खते (organic), व्यवस्थापक (management process), औषध (Medicine), एकात्मिक मूलद्रव्य,अशा गोष्टींना अनुदान दिले जातात. आणि शेतकरी उत्पादन कंपनी (successful farmer producer companies in india) आणि गटातील शेतकऱ्यांची प्रधान्यने पिके हे प्रात्यक्षिकासाठी निवडली जातात. ज्या भागात जे पिके आहेत, तसेच वातावरण आहे त्याच पिकांना निवडले जातात.

हे ही वाचा : आजचा हवामान अंदाज: मान्सूनचा प्रवास सुरु होणार, या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता, पहा तुमच्या जिल्हातील कमाल तापमान!

अशा प्रकारे प्रात्यक्षिक (कंसात खर्च )आणि हेक्टर

पिक (food crops) हेक्टर (hectare) खर्च (expenses)

मूग नंतर रब्बी ज्वारी साठी 900 हेक्टर साठी 1 कोटी 35 लाख अनुदान देण्यात येणार आहे, मुग नंतर गहू 500 हेक्टर अनुदानासाठी 75 लाख अनुदान देण्यात आली आहे. उडीद नंतर ज्वारी 1100 हेक्टर 1 कोटी 65 लाख अनुदान, सोयाबीन आणि तुर 10,000 हेक्टरसाठी 9 कोटी रुपयाचे अनुदान असेल, बाजरी नंतर हरभरा 1100 हेक्टरसाठी 1 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, उडीद नंतर गहू 400 हेक्टरसाठी 60 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

हे ही वाचा : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये फवारणी करताना घ्या, ‘अशी’ काळजी!

या जिल्ह्यांना होणार अनुदान खर्च…

(हेक्टर) खर्च

  • नंदुरबार – (160) 24 लाख
  • नाशिक – (360) 54 लाख
  • धुळे – (150) 22 लाख
  • नगर – (810) 1 कोटी 21 लाख
  • जळगाव (460) 69 लाख
  • सोलापूर – 420) 63 लाख
  • सांगली – (170) 25 लाख
  • सातारा – (160) 24 लाख
  • औरंगाबाद – (230) 34 लाख
  • बीड – (460) 72 लाख
  • कोल्हापूर- (20) 3 लाख
  • नांदेड – 560) 84 लाख उस्मानाबाद –(800) 1 कोटी 20 लाख
  • लातूर – (710) 1 कोटी 6 लाख
  • परभणी –(410) 61 लाख
  • वाशिम -(290 ) 43 लाख
  • नागपूर – (250) 37 लाख
  • चंद्रपूर – (11) 16 लाख
  • यवतमाळ – (430) 64 लाख
  • अमरावती – (770) 1 कोटी 15 लाख
  • बुलढाणा – (600) 90 लाख
  • हिंगोली – ( 440) 66 लाख
  • अकोला -( 490 ) 73 लाख

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button