कृषी तंत्रज्ञान

महत्वाची बातमी : शेतकऱ्यांना घरबसल्या ‘ह्या’ अँपच्या मदतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार..

Important News: Farmers will be able to register their crops with the help of this app.

राज्यातील महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी इ -पिक पाहणी (E-peek survey) ऍप्लिकेशन (Application) तयार करण्यात आले आहे, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पिकाची नोंदणी तसेच अनेक सुविधा (Convenience) पुरवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेळेवर आपल्या पिकाची नोंदणी करण्यासाठी तसेच ॲप्लिकेशनद्वारे सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध होण्यासाठी इ -पिक एप्लीकेशनची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली.

राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दोन-तीन गावे मिळून एक तलाठी (Talathi) कार्यरत असतो अशा वेळी शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, दुष्काळ, पूरग्रस्त परिस्थिती, वादळी अशा नैसर्गिक कारणांमुळे येणारे संकटामुळे नुकसान झाले असल्यास किती क्षेत्रे नुकसान झाले आहे याचा अंदाज लावणे कठीण होऊन बसते अशावेळी एप्लीकेशन उपयुक्त ठरणार आहे.

इ – पिक पाहणी अँप सरकारने टाटा ट्रस्टच्या (Of the Tata Trust)साह्याने निर्माण केले असून पिक विमा काढणे तसेच पिक पाहणी दावे निकाली लावण्यासाठी या ॲप्लिकेशनचा
उपयोग होणार आहे.

वाचा : ‘सीएनजी’ ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा!

वाचा : ‘ड्रोनच्या’ माध्यमातून शेतातील कीटकनाशक फवारणी करताना, यासाठी आहे काय मार्गदर्शन तत्वे वाचा सविस्तरपणे…

महाराष्ट्र राज्यामधील आर्थिक पाहणी व कृषी नियोजन (Economic Survey and Agricultural Planning) करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे, सध्यातरी प्रायोगिक तत्त्वावर 20 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यभर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

इ -पिक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना अचूक शेतीविषयक माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशी माहिती पीक कर्ज घेण्यास उपयुक्त ठरेल शेतकऱ्यांना वापरण्याच्या दृष्टीने अतिशय सुलभ पद्धतीने हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे याचा निश्चितच शेतकऱ्यांसाठी लाभ होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button