ताज्या बातम्या

दहावी – बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज महत्वाची बैठक! ‘काय’ ठरणार आहे, या बैठकीत…

Important meeting today regarding 10th-12th exams !! Read the detailed news in this meeting

कोरोनाने घातलेला विळखा ( Corona pandemic situation) त्याचा थेट त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.
कोरोनाच्या (covid-19) पार्श्वभूमीवर सरकारने कडक नियमावली जारी केली असल्यामुळे दहावी- बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेणार आहे त्यामुळे ही बैठक बोलल्याचे सुत्रांकडून कळते.

या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज 6 एप्रिल रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा होणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे शनिवारी असणाऱ्या पेपरचं काय होणार, त्याचे आयोजन कसे करायचं, यावरही चर्चा होणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे सांगितले गेले आहे तसेच सार्वजनिक वाहतूक यावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावता नियमवाली करण्यात आली आहे. तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली.

शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, बंदच राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button