ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, पुढील काही दिवस पिकांची अशी काळजी घ्या; पहा कृषी सल्ला विषयक सविस्तर माहिती

हवामान: भारतीय हवामान खात्याने बुलढाणा जिल्ह्यासाठी आज वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान कोरडे हवामान राहण्याची तसेच आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विस्तारित स्वरूपाच्या हवामान अंदाज प्रणालीनुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. २७ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर दरम्यान कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

वाचा –

कृषि सल्ला: जिल्ह्यात दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील बाकी असलेल्या पिकांची पेरणी त्वरित करावी तसेच शेतातील उभ्या पिकांमध्ये आंतरमशागतीची, खत देण्याची, फळे/भाजीपाला तोडण्याची आणि पिक संरक्षणाची कामे वेळेवर पूर्ण करावीत.

संक्षिप्त संदेश सल्ला: हरभरा पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी ज्यामुळे बियाण्याचे प्रमाण इतर पेरणी पद्धतीच्या तुलनेत कमी लागते व आंतरमशागतीची कामे सहजपणे करता येतात.

पिक निहाय सल्ला –
हरभरा- हरभरा पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे आणि ट्रा यकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. हरभरा पिकाची पेरणी करताना ओलिताखालील हरभरा पिकाला २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ३० किलो पालाश तसेच कोरडवाहू हरभरा पिकाला २० किलो नत्र + ४० किलो स्फुरद + ४० किलो पालाश प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी द्यावे. हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर दोन दिवसांच्या आत उगवणपूर्व तणनाशक म्हणून पेंडीमेथॅलीन ३० % ई.सी. ४-५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशी- कापूस वेचणी योग्य वेळी करावी. कापूस जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंडबों जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. शेतकरी बंधूंनी प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.

तूर- तुरीवरील कळ्या व फुले खाणाऱ्या हेलीओथिस अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क १० लिटर (प्रती हेक्टर) फवारावा.

सोयाबीन- परिपक्व झालेल्या सोयाबीनची कापणी करावी ,कापलेले सोयाबीन योग्य पद्धतीने वाळवून मळणी करावी. शेतकरी बंधूंनी सोयाबीनची साठवण तागाच्या पोत्यामध्ये करण्यास प्राधान्य द्यावे व एकावर एक अशे सोयाबीनचे पोते ५ फूट उंचीपर्यंतच ठेवावे. साठवणूक केलेली सोयाबीनची पोती खाली वर करावी जेणेकरून सर्व पोत्यातील सोयाबीनमधील ओलावा १०-१२ % राहण्यास मदत होईल.

ज्वारी- रब्बी ज्वारीच्या शेतात डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी व पिक तणमुक्त ठेवावे. ज्याभागात रब्बी ज्वारीची पेरणी होऊन दोन आठवडे पूर्ण झाली आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी विरळणी करावी, विरळणी करताना रोगग्रस्त, किडग्रस्त रोपे काढून टाकावीत.

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:

कागदी लिंबू – लिंबू बागेतील रोगग्रस्त फळे तोडून नष्ट करावीत व रोगाच्या/किडीच्या व्यवस्थापनाकरिता उचित कीटकनाशकांची/कीडनाशकांची लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी.

वाचा –

मिरची- मिरची पिकात फळकुज, फांद्या वाळणे किंवा फळांवरील डाग आढळून आल्यास रोगग्रस्त शेंडे खुडून टाकावेत व नंतर मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायफेनकोनॅझोल ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांच्या अंतराने ३-४ फवारण्या कराव्या.

वांगे- वांगी पिकाचे नियमितपणे निरीक्षण करून प्रादुर्भावग्रस्त फळे तोडावी व त्वरित नष्ट करावीत. संत्रा फायटोप्थोरा ग्रस्त लिंबू फळझाडांवर मेफेनोक्झाम (एम झेड-६८) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एल २.५ ग्रॅम १ लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे व हे द्रावण झाडाभोवती सुद्धा टाकावे.

सिताफळ – सीताफळ बागेतील परिपक्व झालेली फळे तोडून त्याची प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था करावी.

कांदा – कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यास सुरुवात करावी. लागवडीसाठी ए.एफ.एल.आर.,अकोला सफेद किंवा भीमा शक्ती या वाणांची निवड करावी. कांद्याच्या १ हेक्टर क्षेत्राच्या लागवडीसाठी, रोपवाटिकेत गादीवाफ्यावर कांद्याचे १० किलो बियाणे (१० गुंठे क्षत्रात) पेरावे.

पेरू- पेरू फळबागेत फळकुज किंवा फळांवरील डाग आढळून आल्यास मॅन्कोझेब ३५ % डब्ल्यू.जी. या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर करावा.

पशुधन विषयक निहाय सल्ला: गाय पशुपालकांनी आपले जनावर अति स्थूल व अतिदुर्बल असू नये याची काळजी घ्यावी. अति स्थूल जनावरांच्या आहारात फायबरचे जास्त प्रमाण असावे व अति दुर्बल जनावरांना प्रथिनयुक्त आणि खनिजयुक्त आहार देण्यास प्राधान्य द्यावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button