जसे शेतीत बैलाकडून काम करून घेतले जाते तसेच त्यांचीही काळजी घेतली पाहिजे. बैलांचे शेतीमध्ये काम करीत असताना मानेचे कातडी जु व जूवाला असणारी खीळ यामध्ये दाबली जाते आणि खांदे सूजी होण्याच्या समस्या उद्भवतात. आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी-जास्त उंचीची असते. त्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जु हे तिरक राहते. त्यामुळे दोन्ही बैलांना खांदे सुजीचा आजार होतो. या समस्यांवर काय उपाय केले पाहिजेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊया…
वाचा –
खांदेसूज ची लक्षणे –
1) खांद्यावरील भागावर भयंकर सूज येते.
सुज ही खांद्याची कातडी व त्याखाली त्वचेच्या भागावर येते.
2) जु ओढताना खांद्याचे कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी खालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
3) खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते.
सुजेचा आकार हा लिंबू किंवा फुटबॉल एवढा असतो.
4) सुज मउ, पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
5) सुजेतून फुटून पाणी येऊ शकते.
6) खांदेस सूज आलेल्या बैलाला आराम दिल्यास सूज कमी होते कामाला जुपल्यास पुन्हा वाढते.
7) खांदे शूज झालेला बैल उपचाराविना कामास जुपल्यास केल्यास कातडीवर लहान-लहान जखम होऊन बेंड तयार होते.
वाचा –
खांदे सुजीवर उपचार
खांदेसुजीची लक्षणे जनावरात दिसल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावा. नुकत्याच झालेल्या खांदे सुजित सुजलेल्या भागावर चार ते पाच दिवस खांदे सूज कमी करणारे मलम लावा. ताज्या सुजीस बर्फाने तीन ते चार दिवस शेका.
मॅग्नेशियम सल्फेट, ग्लिसरीन मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते. जुन्या सुजी साठी गरम वाळू कपड्यात गुंडाळून चार ते पाच दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने सुद्धा शेक दिला तरी चालतो. शेख देताना जनावरास भाजणार नाही याची खात्री करून घ्यावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा