कृषी सल्ला

महत्वाचे; प्रत्येक सामान्य तसेच शेतकरी कुटुंबामधील विवाहित महिलेला “या” कायदेशीर हक्कांबद्दल माहिती असायला हवी..

काही महिला तर नातं टिकवण्यासाठी अनेक अत्याचारांचा सामना करत असतात. समाजाला घाबरुन तर महिलांसाठी असलेल्या विशेष अधिकार (Special rights) आणि हक्कांबद्दची जागरुकता महिलांपर्यंत नसल्याने महिला अनेकदा पुरुषांच्या छळाला बळी पडत असतात. स्त्रियांना (Female) त्यांच्या संरक्षणासाठी उपयोगी पडणारे कायदे माहीत असणे गरजेचे आहेत. या कायद्याविषयी माहिती जाणून घेऊया…

वाचा –

स्त्री (Female) ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली रहात असेल आणि तिचा छळ त्या पुरुषाकडून होत असेल तर ती कायद्यान्वये न्यायदंडाधिकाऱ्याकडे संरक्षण (Protection to the Magistrate) मागू शकते. पीडित महिला व तिच्या मुलांना निवासाच्या अधिकारासह तिच्या सुरक्षितेचा, आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायदंडाधिकारी देवू शकतात. छळापासून संरक्षण मग ते शारीरिक, लैंगिक, आर्थिक, तोंडी किंवा भावनिक अत्याचार असोत महिलांना त्याविरुध्द न्याय मागता येतो. कायदे खालील प्रमाणे सविस्तर..

1) ‘हुंडा’ बद्दलचा अधिकार –

हुंड्यामुळे महिलांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. हुंडा प्रतिबंधक १९६१’च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे असे हुंड्याचे अधिकार भारताने महिलांना दिलेले आहेत.

वाचा –

2) घरगुती हिंसाचार कायदा –

स्त्रियांच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू केला. महिलेला जर घरी शारीरिक, मानसिक, लैंगिकअत्याचाराला सामोरे जावे लागत असेल तर घरगुती हिसांचाराच्या कायद्याचा अवलंब महिलांनी करायला हवा.

3) संपत्तीचा अधिकार –

अनेक महिलांना माहित नसते की लग्नानंतरदेखील माहेरच्या संपत्तीवर त्या महिलांचा अधिकार असतो. 2005 साली The Hindu Successsion Act, 1956 निर्माण केलेला आहे.

4) गर्भपाताचा अधिकार –

महिलांना गर्भातील मुलाला अबॉर्ट करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी महिलेला तिच्या नवऱ्याच्या परवानगीची गरज नाही. त्यासाठी महिलेने The Medical Termination Of Pregnancy Act,1971 या अधिकाराचा अवलंब करावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button