कृषी सल्ला

मोलाचा सल्ला: गोमातेची अशी घ्या काळजी…

भारतीय संस्कृती मध्ये गाईला आईची उपाधी दिली आहे. ज्या प्रमाणे आई स्वतः च्या मुलांना वाढवते त्याप्रमाणे, गाई तिच्या दुग्धाने सगळ्यांना माया देते. तिच्यासाठी लहान मोठी सगळे सारखेच, अश्या आपल्या घरातील कामधेनू ची काळजी घ्या अशी:-

१. गाईंच्या सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा.
२. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.
३. दूध दोन्ही वेळेस काढताना,कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
४. दुधाळ जनावरांना शक्यतो ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.
५. दुधाळ जनावरांना संतुलित आहार द्यावा.

त्यामध्ये हिरवा चारा, कोरडा चारा, शरीर पोषणासाठी आवश्यक व दुग्धोत्पादनासाठी अतिरिक्त पशुखाद्य, खनिज मिश्रण व मीठ यांचा वापर करावा.तसेच गाईला रोज मिनरल पावडर द्यावी.गाईला ऊसवाडी देण्यापेक्षा मुराघास देणे फायदेशीर आहे. गाईला 3 महिन्यातून एकदा जंताचे औषध डॉक्टर सल्याने द्या. तसेच वर्षातून एकदातरी लिव्हर टॉनिक द्या. वेळोवेळी लसीकरण आणि डॉक्टर सल्ला घेत जा…

महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला आपले जनावरचे खरेदी-विक्री करायची असेल तर ऍग्रोडील्स अँप डाउनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.agrodeals.app

WEB TITLE: Important Advice: Take Care of COW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button