कृषी सल्ला
ट्रेंडिंग

पिकांच्या जीवनक्रमामध्ये ‘ह्या’ घटकांचे महत्व; त्या घटकांची कमतरता, लक्षणे व त्यावर करा, अशा उपाययोजना…

Importance of 'these' factors in crop life cycle; Deficiencies of those components, symptoms and measures, such measures...

ज्याप्रमाणे मानवी शरीराला वाढ होण्यासाठी विविध जीवनसत्वे आवश्यक असतात. प्रथीने, कर्बोदके, आवश्यक आहेत. त्याच प्रमाणे पिकांना देखील उत्तमरित्या बहरण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते. माती व विविध खतापासून अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास पिकांचे जीवन चक्र सुरळीत होते. पीकवाढीसाठी गरजेनुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. पिकांच्या वाढीसाठी 18 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. या त्यातील काही अन्नद्रव्याची माहिती पाहू.
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दृश्‍य परिणाम दिसून येतो.

अन्नद्रव्याचे वर्गीकरण भरपूर लागणारी मुख्य अन्नद्रव्य. व कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्य यांमध्ये केले जाते. पिकांचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी आपण पिकांना लागणारे अन्नद्रव्य ते स्थान त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसून येणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय याचा अभ्यास करू.

🔹 नायट्रोजन:

• पिकातील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणार नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे.
• नाइट्रोजन मुळे पिकांची पाने हिरवीगार राहतात. पाणी आणि खोडाची वाढ झपाट्याने होते.

👉 नायट्रोजनची कमतरता असल्यास काय लक्षणे असतात.

•पिकांची पाने प्रथम पिवळी होतात.
• मुळांची व पिकांची वाढ खुंटते.

📌 काय उपाययोजना कराल:
आवश्‍यकतेनुसार युरिया व नायट्रोजन युक्त खते वापरा.\

🔸 फॉस्फ़ोरास :

• वनस्पतीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
•पिकांच्या पेशींचे विघटन आणि वाढीसाठी फॉस्फरसची गरज असते.

👉 कमतरता असल्यास लक्षणे:

• पिकांची पाने गर्द हिरवी व जांभळी लांबट होतात.
•त्यांची वाढ मंदावते.
📌काय करायला उपयोजना:
आवश्‍यकतेनुसार रासायनिक खते द्यावीत. (सिंगल सुपर फास्फेट).

🔹 पोटॅश:

• पिकांची वाढ जोमदारपणे होते.
• कणखरपणा येतो. त्यामुळे पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत.
• कोरडवाहू जमिनीत बाष्पीभवनाची क्रिया मंदावते,पीक पेशींमध्ये पाणी अधिक काळ साठवून राहते.

👉 कमतरता असल्यास लक्षणे:

• पानांच्या कडा तांबड तांबड सर होऊन त्यावर तांबडे किंवा पिवळे ठिपके दिसतात.
• शेंडे गळून पडतात.

📌 काय कराल उपाय:

आवश्यकतेनुसार पोटॅशियम तर रासायनिक खते( म्युरेट ऑफ पोटॅश ) द्यावीत.

🔹 सल्फर:

• सर्वाधिक गरज तेलबिया उत्पादनासाठी असते.
• कर्बोदके प्रथिने हरिद्रव्य ग्लुकोसाईडचे निर्मितीसाठी सहभाग.
•कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठी मध्ये वाढ करण्यास मदत.

👉 कमतरता असल्यास लक्षणे:

• नवीन येणारे पाणी व पालवी पिवळी पडू लागतात.
•अति कमतरतेमुळे पूर्ण पिक विमा झाडे पिवळी पडून वाढ खुंटते.
• कडधान्यांच्या मुळावर गाठींची संख्या कमी होते.

📌उपाययोजना:

• कमतरता असलेल्या जमिनीत पेरणीच्या वेळेस 30 ते 40 की सल्फर प्रतिहेक्‍टरी जिप्सम किंवा बेन्टोनाईट सल्फर द्वारे घ्यावीत.

🔹 कॅल्शियम:

• पेशीभित्तिका मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिअम मदत करते.
• पिकांमध्ये फुल व फळधारणा क्षमता वाढवण्यासाठी कॅल्शियम मदत करते
•फळांची प्रत उत्तम राखण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.

👉 कमतरता असल्यास लक्षणे:

• पिकांच्या शेंड्याकडील वाढ कळ्या आणि मुलांची वाढ खुंटते
• त्यांची वाढ कमी होते. तसेच बिजोउत्पन्न घटते.
• पिकांच्या पानांच्या कडा करपणे,पिवळे डाग पडणे,टोके ,जळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

लबडे अश्विनी बापूसाहेब
(वनस्पती पोषण तज्ञ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button